डॉक्टर मुलाच्या लग्नासाठी कौमार्य चाचणीचा हट्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Doctor for virginity test for child marriage

जळगाव : डॉक्टर मुलाच्या लग्नासाठी कौमार्य चाचणीचा हट्ट

जळगाव : शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील औषध निर्माणशास्त्राच्या पदवीधर तरुणीचा नंदुरबार येथील डॉक्टर तरुणासोबत विवाह नुकताच झाला. समाजाच्या प्रथा- परंपरांप्रमाणे, या लग्नसोहळ्यापूर्वीच वधूची कौमार्य चाचणी घेण्याचा दोन्ही पक्षांनी बेत आखला असताना याची भनक अंनिसला लागली. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी देान्ही पक्षांना कायद्याची जाणीव करून देत समुपदेशन केल्यावर कौमार्य चाचणी रोखण्यात यश आले.

जळगाव शहरातील रहिवासी तरुणीचा नंदुरबार जिल्ह्यातील डॉक्टर तरुणासोबत शुक्रवारी (ता. २५) लग्न ठरले होते. समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे दोन्ही पक्षाची बोलणी होऊन वधू-वरांनी एकमेकांना पसंत केले. नातलगांच्या पसंतीने लग्न सोहळ्याची संपूर्ण बोलणी ठरून अवघ्या काही दिवसांवर लग्न असतानाच मुलीच्या कौमार्य चाचणीचा हट्ट समोर आला. वरपक्षाच्या मागणीला वधू पक्षानेही संमती दर्शवली अन्‌ दिवस ठरला.

गुप्त फोनद्वारे माहिती

मात्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती समजली. त्यावर जिल्‍हा कार्याध्यक्ष डिगंबर कट्यारे, विश्वजित चौधरी, जितेंद्र धनगर, ॲड. भरत गुजर अशांनी दखल घेत तत्काळ पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना लेखी तक्रार केली. डॉ. मुंढे यांच्या सूचनेवरून पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी पावले उचलून दोन्ही पक्षाला पाचारण केले. समाजातील वडीलधाऱ्या जबाबदार पदाधिकाऱ्यांदेखत वधू-वरांसह दोन्ही पक्षाचे समुपदेशन करण्यात आले.

कायद्याचा धाक...

संबंधिताना विचारपूस केल्यावर त्यांनी या प्रकाराचा इन्कार केला. निरीक्षक शिकारे यांनी संबंधितांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, वेळ पडल्यास जेलची हवा देखील खावी लागेल याची जाणीव करून दिली.

नंतर लग्न सोहळ्याच्या पूर्वीपासून एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला. सोबतच देान्ही पक्षासह समाजातील ज्येष्ठांसह पंचांनी कायद्याचे पालन करण्याची हमी दिली.

Web Title: Doctor For Virginity Test For Child Marriage

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaondoctor