
‘हतनूर’चे चार दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना इशारा
वरणगाव (जि. जळगाव) : विदर्भात नुकताच मान्सूनने प्रवेश केला असून मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने विदर्भ व मध्यप्रदेशातील पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर हतनूर धरणाचे चार दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. यंदा पाहिल्यांदा विसर्ग करण्यात येत असून मुख्य अभियंता एस. जी. चौधरी यांनी धरणाचे पूजन केले.
विदर्भ आणि मध्य प्रदेशात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी (ता. १६) झालेल्या पावसाची नोंद ३९३ मिलीमीटर करण्यात आली. जिल्ह्यात कुठेही पाऊस नसताना हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणाचे चार दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापी नदीपात्रात पाण्याची वाढ झाली असून सद्यःस्थितीत ३ हजार ९५५ क्युसेस पाणी तापी नदीपात्रात सुरू झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील २६ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोणीही आपले गुरेढोरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोडू नयेत, असे आवाहन हतनूर धरणाचे अभियंता एस. जी. चौधरी यांनी केले आहे.
हेही वाचा: ट्रॅफिक कंट्रोल न करता पोलिसांची वसुली : आमदार संजय सावकारे
हेही वाचा: जळगाव : वीज कंपनीचा भोंगळ कारभार आमदारांनी आणला चव्हाट्यावर
Web Title: Doors Of Hatnur Dam Opened Warning To The Riverside Villages
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..