Jalgaon Congress Meeting : जळगाव विधानसभेची जागा काँग्रेस लढविणार

Congress Metting
Congress Mettingesakal
Updated on

Jalgaon News : जळगाव शहरात काँग्रेसच्या मतदारांची संख्या मोठी आहे. यंदा काँग्रेसतर्फे जळगाव विधानसभेची जागा लढणार आणि जिंकणार आहोत.

त्यादृष्टीने प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक प्रभागांत जोमाने कार्य करावयाचे आहे, असे आवाहन काँग्रेसचे माजी खासदार डॅा. उल्हास पाटील यांनी केले. (Dr. Ulhas Patil Say Congress will contest Jalgaon assembly seat Meeting regarding Mandal Booth Committees Jalgaon News)

काँग्रेस भवनात झालेल्या जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा जळगाव शहर जिल्ह्याचे प्रभारी युवराज करनकाळ अध्यक्षस्थानी होते. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्रदेश सचिव विनोद कोळपकर, प्रदेश वक्ता विभागाचे उपाध्यक्ष गणेश रेड्डी, माजी ग्रामीण अध्यक्ष उदय पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे आदी उपस्थित होते.

माजी खासदार डॉ. उल्हास पाटील म्हणाले, की शहरात मंडल व बूथ कमिट्या सक्षम करण्याकडे लक्ष द्या. त्या माध्यमातून आपल्याला महापालिकेत यश मिळवायचे आहे, तसेच आगामी विधानसभा निवडणुकीतही जळगाव शहरातील आपला उमेदवार विजयी करावयाचा आहे.

शहरात मंडल, कमिट्या तयार करण्याबाबत जिल्ह्याचे प्रभारी युवराज करनकाळ यांनी सुचविले. शहर जिल्हाध्यक्ष श्याम तायडे यांनी प्रास्ताविकात शहराची माहिती दिली. यात ७५ टक्के बूथ कमिट्या झाल्याचे त्यांनी निरीक्षकांना सांगितले. २४ जूनपर्यंत मंडल कमिटी स्थापना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Congress Metting
Jalgaon News : ‘नाल’ साठी काळ्या घोड्यांचे हाल; वन्यजीव संरक्षण सदस्यांनी थांबविली तस्करी

अविनाश भालेराव, युवक अध्यक्ष मुजीब पटेल, ब्लॉक अध्यक्ष नदीम काझी, ज्येष्ठ पदाधिकारी वसंत सोनवणे, दीपक सोनवणे, गोकुळ चव्हाण, झाकिर बागवान, शफी बागवान, सुढोर पाटील, सुरेंद्र कोल्हे, रवी चौधरी, साकिना तडवी, अमीना तडवी, छाया कोरडे, योगिता शुक्ल आदी या वेळी उपस्थित होते. शहर सरचिटणीस प्रदीप सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. शफी बागवान यांनी आभार मानले. शहरातील मंजूर कार्यकारिणीतील ७० पदाधिकारी उपस्थित होते.

Congress Metting
Jalgaon Crime News : कत्तलीच्या उद्देशाने उंटांची तस्करी; वरणगावात तिघांवर गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com