Jalgaon News : ट्रॅक्टरखाली दाबला जावुन चालक ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death news

Jalgaon Accident News : ट्रॅक्टरखाली दाबला जावुन चालक ठार

जळगाव : अनियंत्रित झाल्याने उमाळा-धानवड रस्त्यावर सोमवारी (ता. ६) रात्री ट्रॅक्टर उलटले. यात चालकाचा ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू झाला, तर तीन ते चार मजूर जखमी झाले. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राजेंद्र मगरे (३५, रा. निमगाव, ता. जळगाव) असे मृत चालकाचे नाव आहे. चालक राजेंद्र मगरे ट्रॅक्टरमध्ये विटा घेऊन जामनेरला गेला होता. त्याच्यासोबत तीन ते चार मजूरही होते. सायंकाळी विटा पोचवून ट्रॅक्टर पुन्हा परत येते होते. (Driver killed after being crushed under tractor Jalgaon Accident News)

उमाळा-धानवड रस्त्यावर अचानक ट्रॅक्टर उलटला. ट्रॅक्टरच्या खाली दबून चालक राजेंद्र मगरे जागीच ठार झाला, तर इतर मजूर जखमी झाले.

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेवून जखमींना रुग्णालयात हलविले. राजेंद्र मगरे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.