Latest Marathi News | भाऊबीजेला बहिणीकडे गेलेल्या भावाचा बुडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Chaudhary

Jalgaon : भाऊबीजेला बहिणीकडे गेलेल्या भावाचा बुडून मृत्यू

पाचोरा : भाऊबीजेच्या सणानिमित्त बहिणीचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलेल्या पाचोरा येथील १९ वर्षीय युवकाचा वालझिरी (ता. चाळीसगाव) येथे नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. २७) घडल्याने चौधरी कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

शहरातील श्रीरामनगरातील राहुल सुरेश चौधरी हा गुरुवारी (ता.२७) भाऊबीजेसाठी आपल्या बहिणीकडे गेला होता. बहिणीचा आशीर्वाद घेत मोठ्या उत्साहात भाऊबीज सण साजरा केला. दुपारी बाराच्या सुमारास राहुल हा वालझिरी (ता. चाळीसगाव) येथे आयोजित नवसाच्या कार्यक्रमासाठी गेला होता.(Drowning death of brother he going to sisters house for Bhaubij Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon : अहो आश्चर्यम..! आनंदाचा शिध्याचे मध्यरात्रीपर्यंत वाटप

नदीपात्राजवळ हात पाय धुण्यासाठी गेला असता पाय घसरून तो थेट खोल पाण्यात पडला. हा प्रकार सोबत असलेल्यांनी नातलगांना सांगितल्यानंतर धावपळ सुरू झाली.

राहुल यास पाण्यातून बाहेर काढून चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित करताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. मृत राहुल चौधरी याच्या पाश्चात्य वृद्ध आई, बहिण, पाहुणे असा परिवार असून, राहुल चौधरी याच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे. मनमिळाऊ व हसतमुख राहुलच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली.

हेही वाचा: Diwali Festival jalgaon News : सुवर्ण व्यावसायीकांना दिवाळी ठरली ‘त्रिवार लकी’