Diwali Festival jalgaon News : सुवर्ण व्यावसायीकांना दिवाळी ठरली ‘त्रिवार लकी’

Diwali Festival Shopping
Diwali Festival Shopping esakal

जळगाव : यंदाचा दिवाळी सण सोन्या-चांदीच्या सुवर्ण व्यावसायिकांना सोन्याची झळाळी देऊन गेला. धनत्रयोदशीपासून पाडवा, भाऊबीजेपर्यंत सोन्याच्या दागिन्यांची प्रचंड प्रमाणात विक्री झाली. ही विक्री गेल्या दोन वर्षांच्या कोरोनाकाळात झालेल्या तोट्याची भर काढणारी ठरली आहे. यामुळे सुवर्ण व्यावसायिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.

कापूस हंगाम काही नुकसान वगळता चांगला ठरला. हातात आलेल्या कापसाला साडेसात ते नऊ हजारांचा दर मिळाला. त्यापूर्वी बागायती कापसाला तेरा ते सोळा हजारांचा दर विजयादशमीच्या पूर्वी मिळाला होता. अनेक शेतकऱ्यांनी कापूस विकल्याने शेतकऱ्यांच्या हातात सोने खरेदीसाठी पैसा आला. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना ८५ दिवसांचा पगार बोनस दिला. यामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी एका रात्रीत लखपती झाले.(Diwali Festival Jalgaon Diwali Lucky for gold traders deficit of two years of Corona cleared Central employees prefer to buy gold Jalgaon News)

Diwali Festival Shopping
Crime Update : शहरात वाहने पेटवून देण्याचे सत्र सुरूच !

शासकीय कर्मचाऱ्यांनाही पगार दिवाळीच्या अगोदर झाला. खासगी कंपन्यांनीदेखील दिवाळीच्या दहा दिवस अगोदर पगार, बोनसचे वाटप केले. याचा एकत्रित परिणाम ग्राहकांच्या हातात मोठा पैसा आला. त्याचा परिणाम बाजारपेठेत सर्वच क्षेत्रांतील वस्तूंना मागणी वाढली.

सर्वांत चांगली गुंतवणूक म्हणून सोने खरेदीकडे पाहिले जाते. अनेकांनी सुवर्णखरेदीची मोठी हौस फेडून घेतली. काहींनी आगामी काळात मुला-मुलींच्या लग्नासाठी सोने खरेदी केले. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात निर्बंधात खरेदी होत असे. यंदा मात्र निर्बंधमुक्त वातावरणात दिवाळी साजरी झाल्याने सर्वांनीच मनसोक्त विविध प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीचा आनंद लुटला.

Diwali Festival Shopping
Nationalist Congress Party Statement : ‘आनंद शिधा’ ची रक्कम नागरिकांना परत करा

भाव स्थिरतेचा परिणाम

दिवाळी म्हणजे सोन्याची खरेदी असे सूत्र ठरलेले असते. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडव्याला घरच्या लक्षमीसाठी सोने खरेदीची यंदा धूम झाली, तर भाऊबीजेला बहिणींना देण्यासाठी सोने खरेदी झाली. यासोबत हौस म्हणून विविध प्रकारच्या फॅन्सी दागिन्यांची खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली. धनत्रयोदशीला सोन्याचा दर ५१ हजार (विनाजीएसटी) प्रतितोळा होता, तर चांदीचा दर ५९ हजार प्रतिकिलो होता. तोच दर दिवाळीच्या पर्वात कायम राहिला. यामुळे ग्राहकांचा कल सोन्याकडे अधिक राहिला.

"सोने खरेदीने कोरोना महामारीतील तोट्याची भर यंदाच्या दिवाळीने काढून दिली आहे. दिवाळीचे सर्वच दिवस (ग्रहणाचा दिवस वगळता) आमचे शोरूम हाउस फुल होते. सर्वच प्रकारच्या दागिने, सोन्याची चीप, डायमंड यांना मोठी मागणी होती. अजून काही दिवस सोन्याची खरेदी सुरूच राहील."

-मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी,रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स

Diwali Festival Shopping
Crime Update : तरुणाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com