Jalgaon PWD News : चौपदरीकरण पूर्ण.. तरी दिवे नाही; मनपाच्या उदासीनतेमुळे अजिंठा मार्गावर ‘अंधेरा’ कायम

The road leading from Ajantha Chowk to Chhatrapati Sambhajinagar is in darkness as there are no street lights.
The road leading from Ajantha Chowk to Chhatrapati Sambhajinagar is in darkness as there are no street lights.esakal

Jalgaon PWD News : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने जळगाव- छत्रपती संभाजीनगर रस्त्याच्या टप्प्यातील जळगाव शहर हद्दीतील काम पूर्ण केले खरे.. मात्र, या मार्गावर अजिंठा चौक ते मानराज चौफुलीपर्यंत आवश्‍यक असलेल्या पथदिव्यांचे काम महापालिकेच्या आडमुठे धोरणामुळे रखडले आहे.

हा मार्ग मनपाच्या अखत्यारित नसला तरी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत सूचना देत शासकीय निधी उपलब्ध करून देण्याचे सूचित करूनही मनपाला अद्याप या कामासंबंधी प्रस्तावही तयार करता आलेला नाही.(Due to indifference of municipality darkness remains on Ajantha Marga jalgaon PWD news )

राष्ट्रीय महामार्गावरील अजिंठा चौकातील सर्कल आणि पुढे अजिंठा मार्गावर होणारी वाहतुकीची वर्दळ यामुळे या मार्गावर सतत अपघात घडत असून निष्पापांचा बळी जात आहे. या मार्गावरील अंधारामुळे अपघातांची संख्याही वाढतेय, त्यामुळे थेट मानराज चौकापर्यंत पथदिव्यांची गरज आहे.

जळगाव- छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले. जळगाव शहर हद्दीत अजिंठा चौक ते मानराज चौफुलीपर्यंतचे अडीच किलोमीटरचे कामही नुकतेच पूर्ण झाले आहे. आता हा महामार्ग थेट छत्रपती संभाजीनगरपर्यंत काही वळण रस्ते वगळता जवळपास ९५ टक्के पूर्ण झाला आहे.

पथदिव्यांचा विसर

अजिंठा चौफलीपासून मानराज व पुढे सुप्रिम कॉलनी चौफुलीपर्यंत या रस्त्यावर पथदिव्यांची आवश्‍यकता आहे. या महामार्गावरून कुसुंबा, चिंचोलीपर्यंत उद्योग दुतर्फा स्थायिक असून शहरातील मोठ्या प्रमाणावर तरुण, नागरिक रोजगारासाठी या रस्त्यावरून ये- जा करीत असतात.

बहुतांश जणांची रात्रपाळी असते. त्यामुळे या महामार्गावर पथदिवे लावणे अत्यावश्‍यक बनले आहे. महामार्ग पूर्ण होऊन वर्ष उलटले तरी पथदिव्यांची व्यवस्था करण्याचा मनपास विसर पडला आहे.

The road leading from Ajantha Chowk to Chhatrapati Sambhajinagar is in darkness as there are no street lights.
Jalgaon PWD : शिवाजीनगर ‘टी’ पुलासाठी निधीच नाही; अधिकाऱ्याचे धक्कादायक उत्तर

महामार्ग विभागाची ‘ना’

या महामार्गाचे मानराज चौकापर्यंतचे काम पूर्ण करण्यात आले. अजिंठा चौक ते मानराज मोटर्सपर्यंतचा टप्पा महामार्गाच्या धुळे विभागात तर त्यापुढील मार्ग जालना विभागात येतो. या कामात पथदिव्यांच्या कामाचा समावेश नव्हता. मुळात, महामार्ग विभाग शहर अथवा गावाच्या हद्दीतून मार्ग जात असेल तर त्यावर पथदिवेही लावत होता.

मात्र, या दिव्यांच्या देखभाल- दुरुस्ती, वीज बिल कुणी भरावे? यावर हे काम अडायचे. त्यामुळे महामार्ग विभागाने पथदिव्यांचे काम करण्यास नकार देऊन मनपास त्याबाबत सूचित केले.

धुळे विभागाची नाहरकत

या मार्गावर मानराज मोटर्सपर्यंत पथदिवे बसविण्यासाठी महामार्गाच्या धुळे विभागाने नाहरकत पत्र दिले आहे. मानराज मोटर्स ते पुढे कुसुंबा नाक्यापर्यंतही पथदिव्यांचे काम प्रस्तावित असले तरी ते कोण करणार? हा प्रश्‍न आहे.

मात्र, अद्याप राष्ट्रीय महामार्गाच्या जालना विभागाचे नाहरकत प्राप्त नाही. मनपाच्या महासभेत हे काम करण्यासंबंधी धोरणही ठरविण्यात आले असून शासकीय निधी उपलब्ध झाल्यास मनपा हे काम करेल, असा विषय झाला आहे.

The road leading from Ajantha Chowk to Chhatrapati Sambhajinagar is in darkness as there are no street lights.
Nashik PWD News : ‘बांधकाम’ने घटविला निविदा कालावधी; दीड कोटीपर्यंतच्या कामांसाठी 8 दिवस

मनपाची उदासीनता कायम

जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. मनपा प्रशासनाने निधी नसल्याचे नेहमीचे कारण पुढे केले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव द्या, निधीची व्यवस्था करू, असे सूचित केले. मात्र, नंतर मनपाच्या उदासीनतेमुळे अद्याप त्यासंबंधी प्रस्तावही तयार झालेला नाही.

राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे होऊ शकते काम

शहरातून जाणाऱ्या खोटेनगर ते कालिंका माता चौकापर्यंतच्या चौपदरी महामार्गावर महापालिकेने जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या दोन कोटींच्या निधीतून पथदिव्यांचे काम केले. त्याच धर्तीवर अजिंठा चौक ते मानराज मोटर्सपर्यंत रस्त्यावर पथदिवे बसवले जाऊ शकतात. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांना साकडे घातल्यास हे काम मार्गी लागू शकते. मनपाची त्यासाठी मानसिकता हवी, अशी अपेक्षा आहे.

''अजिंठा चौक ते मानराज मोटर्स मार्ग मनपाच्या अखत्यारित नसला तरी राष्ट्रीय महामार्गापमाणे या रस्त्यावरही पथदिव्यांचे काम आपण करु शकतो. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत सूचना दिल्या आहेत. आपल्याला धुळे विभागाने मानराज मोटर्सपर्यंतच्या रस्त्यावर पथदिवे उभारण्यासाठी नाहरकत दिले आहे, मात्र पुढे कुसुंबा नाक्यापर्यंतचा रस्ता जालना विभागांतर्गत येतो.

त्यांचे नाहरकत बाकी असल्याने या कामाचा प्रस्ताव करण्याचे रखडले. तरीही आपण, मानराज मोटर्सपर्यंत पहिल्या टप्प्यातील कामाचे अंदाजपत्रक तयार करीत आहोत.''- चंद्रकांत सोनगिरे शहर अभियंता, मनपा, जळगाव.

The road leading from Ajantha Chowk to Chhatrapati Sambhajinagar is in darkness as there are no street lights.
Jalgaon PWD News : ‘साबांवि’च्या नावाने बोंब! मनपाचे कामही बोगसच; महिन्यात उखडले रस्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com