Jalgaon : वाळूटंचाई अभावी पर्यायी वाळूचा वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे सक्त आदेश

Jalgaon District Collector Aman Mittal
Jalgaon District Collector Aman Mittal esakal
Updated on

जळगाव : नदीतील वाळूउपसा जिल्हाधिकाऱ्यांनी बंद केला आहे. त्यामुळे वाळूची टंचाई निर्माण झाली असून, मक्तेदारांनी शहरातील कामे बंद केली आहेत. तर जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत वाळूउपसा होणार नाही, म्हणून खडीचा कच वापरा, असे सक्त आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरात वाळू टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. (Due to shortage of sand District Collector order to use alternative sand Latest Jalgaon News)

जिल्ह्यातील नद्यांमधील अमर्याद वाळूचा उपसा मक्तेदारांनी केला आहे. गिरणा नदीतील सर्वच भागांतील वाळू संपली आहे. जळगाव शहरालागत गिरणा नदीतून तर अमर्याद वाळूचा उपसा करण्यात आला आहे. अगदी नदीवरील पुलाच्या पिलरजवळील वाळूही उपसण्यात आली आहे. त्यामुळे पीलर उघडे पडले आहेत. भविष्यात पुलाला धोका निर्माण होण्याचीही शक्यता आहे. जिल्ह्यातील वाळूउपशाची ही गंभीर स्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी वाळूउपशाला बंदी घालून कडक कारवाई सुरू केली आहे.

मक्तेदारांनाही सक्त ताकीद

जिल्हाधिकाऱ्यांनी वाळूउपसा करणाऱ्यांवरच कारवाई केली नाही, तर वाळू वापर करणाऱ्या बांधकाम मक्तेदारांवर कारवाईची कंबर कसली आहे. त्यांनी बांधकामात नदीच्या वाळूचा वापर न करता ‘खडीचा कच’ या पर्यायी वाळूचा वापर करावा, असे आदेश दिले आहेत. तर स्टोन क्रशरचालकांना पत्र देऊन पर्यायी वाळू तयार करून उपलब्ध करून द्यावी, असे आदेश दिले आहेत.

Jalgaon District Collector Aman Mittal
Nashik: पाथर्डीत रंगली वाघ्या- मुरळी पार्ट्यांची जुगलबंदी अन् ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ गजर

शहरातील कामे बंद

वाळूउपशाला बंदी असल्यामुळे मक्तेदारांनी शहरातील कामे बंद केली असल्याची माहिती मिळाली. महापालिकेने मक्तेदारांना शहरातील कामे दिली होती. मात्र, वाळूच उपलब्ध होत नाही, तसेच ‘खडीचा कच’मुळे कामे पक्की होण्याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. त्यामुळे सध्या तरी मक्तेदारांनी कामे बंद केली असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत मक्तेदार लवकरच आयुक्तांना पत्र देऊन वाळूबाबत अडचणीची माहिती देणार आहेत.

"शहरातील कामे थांबविल्याबाबत महापालिकेतील मक्तेदारांनी आपल्याला कोणतेही पत्र दिलेले नाही. मात्र, त्यांनी पत्र दिल्यास आपण त्याबाबत चर्चा करून निर्णय घेणार आहोत."

डॉ. विद्या गायकवाड, आयुक्त, महापालिका

Jalgaon District Collector Aman Mittal
Nashik : पोलिस निरीक्षक कदमांच्या आत्महत्त्येचे गूढ कायम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com