esakal | राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून खडसेंवरील ईडी कारवाईचा निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

Nationalist Congress Women's Front

राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून खडसेंवरील ईडी कारवाईचा निषेध

sakal_logo
By
चेतन चौधरी


भुसावळ : केंद्र सरकार (Central Government) किंवा महाराष्ट्रातील (Maharashtra) भाजप नेत्यांच्या (BJP Leader) विरोधात बोलल्यास ईडीचा (ED) वापर भाजपाच्या कार्यालयातून होतोय, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ( NCP Leader Eknath Khadse)यांना अशाच प्रकारे नाहक त्रास दिला जातोय, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे (Nationalist Congress Women's Front) आज (ता. १३) तहसीलदार दीपक धिवरे यांना निवेदन देऊन, ईडीचा निषेध (Protest movement) करण्यात आला आहे.

(ed action aknath khadse protest against by ncps womens front)

हेही वाचा: वरखेडे-लोंढे बॅरेज प्रकल्पात पाणी आडवण्याचा मार्ग झाला मोकळा

निवेदनात म्हटले की, भोसरी येथील जमिनीच्या संदर्भात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी वारंवार सांगितले आहे की, हा व्यवहार संपूर्णपणे खाजगी स्वरुपाचा आहे. सरकारचे या व्यवहारामुळे काहीही नुकसान झालेले नाही हा व्यवहार मंदाकिनी खडसे व गिरीश चौधरी यांच्या नावाने असून तो अधिकृत आहे. त्यासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी सुद्धा भरलेली आहे. श्री. खडसे यांचा या व्यवहाराशी कोणताही संबंध नसताना जाणीवपूर्वक ईडीकडून त्यांना बोलावण्याचा प्रश्न न काय ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

श्री. खडसे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तात्काळ ईडीकडून चौकशी सुरू झाली. यामध्ये राजकीय वास असल्याचे दिसून येते. यापूर्वी अनेक वेळ चौकशा होऊन सुद्धा पुन्हा ईडीची चौकशी होते, त्यामुळे राजकीय दबावातून ईडी कार्य करीत आरोप करण्यात आला आहे. केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून भाजपने श्री खडसे यांच्या कुटुंबियांवर कुरघोडी करण्याचा केविलवाणा प्रकार सुरू केलेला असून हा प्रकार तात्काळ थांबवून त्यांचा मानसिक छळ थांबवावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर राष्ट्रवादी महिला आघाडी शहराध्यक्ष नंदा निकम, प्रकाश निकम, विलास लढे, सीता बाविस्कर, आरिफ खाटीक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

loading image