Sakal Exclusive : ‘योग्य’ प्राचार्यांच्या निवडीला खानदेशात ग्रहण; वय वर्षे 62 हून 65 पर्यंत सेवावाढीची धडपड

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Bahinabai Chaudhari uttar Maharashtra Universityesakal

Sakal Exclusive : महाविद्यालयात प्राचार्यपदासाठी पात्र उमेदवार असताना ६२ वय पूर्ण केलेल्या प्राचार्यांना वयाच्या पासष्टीपर्यंत पदावर राहण्याची धडपड काही महाविद्यालयांत दिसून येते. दोनदा जाहिरात देऊनही संबंधित संस्थेकडे आलेल्या अर्जांना येनकेन प्रकारे अपात्र ठरवून हे प्राचार्य स्वतः ६५ वयापर्यंत संधी साधण्याच्या प्रयत्नात आहेत.

विशेषतः कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत काही महाविद्यालयांमध्ये असे पदसिद्ध प्राचार्य पात्र उमेदवारांच्या अर्जांना अवैध ठरवून संस्थेची आणि शासनाची दिशाभूल करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

भुसावळमधील एका प्रतिथयश महाविद्यालयांत काही महिन्यांपूर्वी असाच प्रकार घडला होता. विद्यापीठाने त्या प्रकरणाचीही गंभीर दखल घेतली होती. त्यामुळे योग्य आणि पात्र प्राचार्य निवडीला एकप्रकारे ग्रहण लागले आहे. काही निर्णयांचा विपर्यास करून त्यांचा गैरवापर करण्याची चुकीची परंपरा शिक्षण क्षेत्रात रूढ होऊ पाहत आहे. (Efforts to increase service age from 62 to 65 years in kbcnmu jalgaon news)

राज्यांतर्गत कार्यरत अकृषी विद्यापीठाशी संलग्नित अशासकीय महाविद्यालयांमध्ये पात्र व अनुभवी अध्यापकांची कमतरता असल्याने शासनाने एक निर्णय घेतला. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०१९ (५०३/१०/) ५ मार्च २०११ नुसार रिक्त प्राचार्यांचे प्रमाण वाढल्याने महाविद्यालयांना प्राचार्यपदी उमेदवार मिळेनासे झाले.

त्यामुळे प्राचार्यांच्या निवृत्तीचे वय ६२ वरून ६५ वर्षे करण्यात आले. या निर्णयातील परिच्छेद (११/५) नुसार प्राचार्यांना ६२ वर्षांनंतर निवृत्तीसाठी मुदतवाढ देण्यापूर्वी संस्थेने रिक्त जागा भरण्याकरिता नामांकित वृत्तपत्रात किमान दोनवेळा जाहिरात देऊन पद भरण्याचे प्रयत्न केलेले असावेत, अशी अट ठेवण्यात आली. दोनवेळा जाहिरात देऊनही पात्र उमेदवार न मिळाल्यास विहित २८ निकष पूर्ण केलेल्या प्राचार्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय त्या वेळी घेण्यात आला होता.

६२ वयापर्यंत पद उपभोगल्यानंतरही पदाच्या हव्यासापोटी पात्र उमेदवारांना संधी न देता त्यांना अपात्र ठरविण्याचे प्रकार समोर येत आहेत. एकीकडे नवीन शैक्षणिक धोरणात गुणवत्ता आणि ऊर्जावान प्राध्यापकांना संधी मिळण्याबाबत शासन प्रयत्नशील असताना अशा प्रकारच्या अपप्रवृत्तींमुळे शैक्षणिक क्षेत्र बदनाम होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Jalgaon News : रावेरला वादळी पावसामुळे 973 हेक्टरवर नुकसान

अनेक महाविद्यालयांमध्ये निवृत्तीला आलेल्या ज्येष्ठ प्राध्यापकांनी संस्थाचालकांशी हितसंबंध जोपासून प्राचार्यपदी वर्णी लावून घेतली आहे. निवृत्तीला काही महिने किंवा एखादे वर्ष शिल्लक असताना प्राचार्य पदाचा पगार विचारात घेऊन ही प्राध्यापक मंडळी प्राचार्यपदी विराजमान झालेली दिसत आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अशा संस्था आणि प्राचार्यांना वेळीच रोखणे आवश्यक आहे.

"प्राचार्यांच्या निवृत्तीचे वय ६२ वर्षे आहे. पूर्वी प्राचार्य पदासाठी पात्र उमेदवार उपलब्ध होत नव्हते. म्हणून शासनाने तीन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. मात्र, आता पात्र उमेदवार मुबलक आहेत. असे असूनही प्राचार्य पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जांना महाविद्यालयांच्या छाननी समितीकडून अपात्र ठरविले जाते. एकही पात्र उमेदवार मिळाला नसल्याचा खोटा अहवाल विद्यापीठाकडे पाठविला जातो.

जर एखाद्या उमेदवाराने विद्यापीठाकडे तक्रार केली, तर त्याला मुलाखतीला बोलावले जाते. मात्र, त्यानंतरही निवड समिती मार्फत ‘नॉट सुटेबल कॅन्डिडेट’ असा शेरा लिहिण्याचे कार्य केले जाते. वास्तविक मुलाखतीला आलेले सर्वच पात्रच असतात, त्यापैकी एकाची निवड समितीला करावीच लागते. कुलगुरूंकडे या संदर्भात तक्रार केली आहे. विद्यापीठाने अशा प्रकरणांची चौकशी करावी व या गैरप्रकारांना आळा घालून शासनाची फसवणूक थांबवावी." - प्रो. एकनाथ नेहेते, अधिसभा सदस्य, क. ब. चौ. उमवि, जळगाव

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Jalgaon News : खेडीभोकरी शिवारात 400 हेक्टरवर नुकसान; पूर आला, पिके घेऊन गेला...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com