Eknath Khadse News : सीएमव्हीग्रस्तांना आठवडाभरात भरपाई द्यावी; एकनाथ खडसेंची मुख्यमंत्री कृषिमंत्र्यांकडे मागणी

Eknath Khadse
Eknath Khadse esakal

Eknath Khadse News : जळगाव जिल्ह्यातील केळी बागांवर २०२१-२०२२ मध्ये आलेल्या ‘सीएमव्ही’ रोगामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आठवडाभरात भरपाईची रक्कम देण्यात यावी, तसेच या वर्षी प्रार्दुभाव झालेल्या क्षेत्राचे तातडीने पंचनामे करून केळी उत्पादकांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी आदी मागण्यांचे पत्र आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना दिले आहे. (Eknath Khadse demand to CMV sufferers should be compensated with in week jalgaon news)

आमदार खडसे यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले, की जळगाव जिल्ह्यात केळी लागवडीसाठी विविध कंपन्यांकडून टिश्यू कल्चर रोपे पुरविण्यात येतात. ही रोपे टिश्यू कल्चर लॅबमध्ये तयार केली जातात. या रोपांवर मागील दोन -तीन वर्षांपासून कुकुंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. हा रोग दिवसेंदिवस फैलत जाऊन संपूर्ण केळी बाग प्रभावित होते.

परिणामी, सर्व केळी रोपे उपटून फेकाल्याशिवाय शेतकऱ्यांजवळ दुसरा पर्याय उरत नाही. परिणामी, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत असून, महागडे टिश्यू कल्चरचे रोप लागवड खर्च, मशागत खर्च, खते व विविध फवारणीचा खर्च मंजुरी यासह रोपे उपटून फेकल्यानंतर दुसरी लागवड होत नसल्याने हंगामही वाया जात आहे. त्यातच मागील वर्षी सीएमव्हीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई सुद्धा अद्याप मिळालेली नाही.

Eknath Khadse
Eknath Khadse News : सातत्याने नफ्यात असलेला दूध संघ यंदा तोट्यात : एकनाथ खडसे

तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीच्या तक्रारीमुळे पीकविम्याची रकमही मिळत नाही. जिल्ह्यातील केळी उत्पादक तिहेरी संकटात सापडला असून, शासनाकडून तत्काळ नुकसान भरपाई मिळेल, या आशेने पाहत आहे. ही टिश्यू कल्चर रोपे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना बियाणे नियंत्रण कायद्याच्या कक्षेत आणल्यास शेतकऱ्यांना रोपे निर्मिती करणाऱ्या कंपनीवर नुकसान भरपाईचा दावा करता येईल, म्हणून मी मागील अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

मात्र अधिकारी व विधान परिषद सदस्य, माजी मंत्री वित्त व नियोजन, महसूल, कृषी, जलसंपदा व उत्पादन शुल्क मंत्र्यांना कदाचित प्रश्नच न समजल्यामुळे वेगळेच उत्तर देण्यात आले. जिल्ह्यात शेकडो हेक्टर क्षेत्रावर सीएमव्ही या प्रार्दुभाव झाला असून, अद्यापही पंचनामे करण्याबाबत कार्यवाही सुरू नाही. या प्रकरणी आपण गांभीर्याने दखल घेऊन खालील बाबींवर तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी खडसे यांनी पत्रात केली आहे.

Eknath Khadse
Eknath Shinde : अखेर ठरलं! कल्याण लोकसभेची जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाच मिळणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com