Jalgaon Politics : एकनाथ खडसेंना जेलमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही : आमदार मंगेश चव्हाण

Eknath Khadse- Mangesh Chavan
Eknath Khadse- Mangesh Chavanesakal

जळगाव : जिल्हा दूध संघातील गैरव्यवहार एकनाथ खडसे यांच्या घरापर्यंत आला आहे. त्यामुळे त्यांचा शेवटचा थयथयाट सुरू आहे. त्यांना जेलमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा दावा भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी गुरुवारी (ता. ८) केला.


जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते. श्री. खडसे यांनी जिल्ह्यातील बहुजन समाजाचे नेतृत्व संपविले आहे. आपण बहुजन मराठा समाजातील असल्याने आपल्यालाही संपविण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही आमदार चव्हाण यांनी केला.
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमुळे आरोपाच्या जोरदार फैरी झडू लागल्या आहेत. जिल्हा दूध संघात प्रशासकपदी असताना, आमदार मंगेश चव्हाण यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करावा, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर शुक्रवारी (ता. ९) सुनावणी होणार असल्याची माहितीही श्री. खडसे यांनी दिली होती. त्यावर भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी उत्तर दिले.
हेही वाचा: Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, की प्रशासक काळात गैरव्यवहार झाला, हा एकनाथ खडसे यांचा जावईशोध आहे. वास्तविक, गैरव्यवहार त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे अध्यक्ष असतानाच झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना अटक झाली होती. त्यांनीही पोलिसांच्या जबाबात गुन्हा कसा घडला, याची माहिती दिली आहे.

मुलाची शपथ, मी गैरव्यवहार केला नाही!
एकनाथ खडसे नेहमी काहीतरी सनसनाटी निर्माण करण्यासाठी आरोप करीत असतात. आपण जिल्हा दूध संघात तब्बल ३२ दिवस मुख्य प्रशासक होतो. मात्र, या काळात आपण एकही पैशाचा भ्रष्टाचार केला नाही. आपण आपल्या मुलाची शपथ घेऊन सांगतो, की मी जर भ्रष्टाचार केला असेल, तर आमच्यावर संकटे येतील.

Eknath Khadse- Mangesh Chavan
Eknath Khadse Son Death : खडसेंच्या मुलाच्या मृत्यूची चौकशी करा, असं गिरीश महाजन का म्हणाले?

खडसेंनी अनेकांना संपविले
एकनाथ खडसे नेहमीच आपल्या विरोधकांना संपविण्यासाठी असे आरोप करीत असतात, असे सांगून आमदार चव्हाण म्हणाले, की त्यांनी सुरेशदादा जैन, ॲड. रवींद्रभय्या पाटील, डॉ. सतीश पाटील, बाळासाहेब चौधरी यांच्याविरोधात असेच सनसनाटी आरोप करून त्यांना राजकारणात संपविण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यासारख्या मराठा बहुजनालाही त्यांचा संपविण्याचा प्रयत्न आहे. मात्र, आपण त्यांना घाबरणार नाही.

मला ‘ईडी’ची नोटीस
एकनाथ खडसे यांनी आपल्याविरुद्ध अनेक तक्रारी केल्या आहेत. माझ्या बायकोविरुद्धही त्यांनी तक्रारी केल्या आहेत. मलाही ‘ईडी’ची नोटीस आली आहे. त्याला आपण उत्तरही दिले आहे. जमिनी खरेदी व बांधकाम व्यवसायातून आपण कमाई केली आहे. आपण कोणाचाही पैसा बुडविलेला नाही. खडसे यांनी आपण पैसा बुडविलेला एक व्यक्ती आणून दाखवावा, आपण त्यांची जाहीर माफी मागण्यास तयार आहोत.

Eknath Khadse- Mangesh Chavan
Eknath Khadse : खडसेंचे कारनामे लवकरच बाहेर येणार - गिरीश महाजन

मात्र त्यांनी जिल्हा दूध संघात नोकर भरतीसाठी घेतलेल्या पैशाचा पुरावा म्हणून अनेक जण त्यांच्या मुक्ताईनगरातील दारात उभे करू शकतो. खडसे यांनी एका व्यासपीठावर येऊन आपल्याशी चर्चा करावी. आपण त्यांना पुराव्यासह सर्व सिद्ध करून दाखवू. आपली खडसे नावाविरुद्ध नव्हे, तर वृत्तीविरुद्ध लढाई आहे. ती आपण लढून ही वृत्ती संपविणार आहोत. जिल्हा दूध संघाचा गैरव्यवहार खडसे यांच्या दाराशी आला आहे. त्यामुळे त्यांना जेलमध्ये जावेच लागले, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com