eknath khadse on raksha khadses daughter molestation : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत काही टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. २८ फेब्रुवारी रोजी मुक्ताईनगरमधील यात्रेत ही घटना आहे. या घटनेनंतर आता सर्वत्र संताप व्यक्त होतो आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांनीही याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं.