Jalgaon News : एकता महिला मंडळाची दुःखावर फुंकर! निधन झालेल्या समाजबांधवांच्या घरी पोचवणार शिदोरी

Ekta Mahila Mandal will deliver food to home where someone died jalgaon news
Ekta Mahila Mandal will deliver food to home where someone died jalgaon newsesakal

Jalgaon News : एखाद्या कुटुंबात मृत्यूची घटना घडल्यानंतर त्या घरात स्वयंपाक केला जात नाही. अशा कुटुंबीयांच्या त्या दिवसाची जेवणाची व्यवस्था शेजारचे किंवा नातलग करतात. मात्र, प्रत्येकाच्या बाबतीत असे होईलच असे नाही. (Ekta Mahila Mandal will deliver food to home where someone died jalgaon news)

शहरातील शिंपी समाजातील कुठल्याही भागातील समाजबांधवांच्या घरी दुःखद घटना घडल्यानंतर त्या कुटुंबाच्या घरी पहिल्या दिवशी शिदोरी (जेवण) पोचवण्याचा निर्णय घेऊन येथील एकता महिला मंडळाने दुःखावर जणू फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे. शिंपी समाजातील महिलांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जळगाव शहर एकता महिला मंडळाच्या नुकत्याच झालेल्या मेळाव्यात हा सर्वानुमते निर्णय घेऊन तसा ठरावच पारीत करण्यात आला. संस्थेच्या सचिव रेखा कापडणे यांच्या निवासस्थानी झालेल्या मेळाव्याला शहरातील शिंपी समाजातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

यावेळी अखिल भारतीय मध्यवर्ती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष वनेश खैरनार, राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शिंपी व विश्वस्त पी. टी. शिंपी यांची विशेष उपस्थिती होती.

याशिवाय जळगाव जिल्हाध्यक्ष बंडू शिंपी, एरंडोल शिंपी समाजाचे अध्यक्ष संजय इसई, जळगाव शहर शिंपी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप, सचिव सुजित जाधव, पिंप्राळा शिंपी समाजाचे अध्यक्ष यशवंत शिंपी, महाबळ परिसराचे संस्थापक अध्यक्ष किशोर निकुंभ, एकनाथ बाविस्कर, सोमनाथ बाविस्कर, रमेश बोरसे, जितेंद्र कापडणे उपस्थित होते. मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सारिका शिंपी यांनी प्रास्ताविक केले. रेखा कापडणे यांनी आभार मानले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ekta Mahila Mandal will deliver food to home where someone died jalgaon news
Jalgaon Temple Dress Code : जळगाव जिल्‍ह्यातील 30 मंदिरांमध्‍ये वस्‍त्रसंहिता? 2 मंदिरात झाले ठराव

मेळाव्याला एकता शिंपी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सारिका शिंपी, मनीषा निकुंभ, रेखा कापडणे, रजनी शिंपी, वैशाली जाधव, मनीषा कापुरे, भारती निकुंभ, सुनीता सोनवणे, रंजना बाविस्कर, ज्योती सोनवणी, उमा कापुरे, शैला शिंपी, चित्रा शिंपी, ज्योती सोनवणे, शारदा शिंपी, ज्योती शिंपी, भारती शिंपी, कल्पना जगदाळे, चित्रा अहिरराव, रिंकू सोनवणे, मंगला शिंपी, रेखा शिंपी, प्रमिला शिंपी, उज्ज्वला भांडारकर, ललिता चव्हाण, दीपाली चव्हाण, सुनीता सोनवणे, ज्योती बाविस्कर, कीर्ती बाविस्कर, आशा शिंपी, नंदिनी शिंपी, ममता शिंपी, जया शिंपी, आशा जाधव, कल्पना अहिरराव, ज्योती नेरपगार, माधुरी, दीपाली शिरसाठ यांची उपस्थित होती.

गरजू महिलांना शिवणयंत्र

महिला मंडळाच्या सभेत विविध सामाजिक ठराव पारित करण्यात आले. त्यात समाजातील गरीब व गरजू महिलांना अल्प भाडे तत्त्वावर शिवणयंत्र देण्याबाबतही ठराव करण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष वनेश खैरनार यांनी महिलांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

सचिव सुजित जाधव, किशोर निकुंभ यांनी मनोगत व्यक्त केले. महिलांतर्फे राबविल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी शिवाजीराव शिंपी यांनी पाच हजार, पी. टी. शिंपी व बंडू शिंपी यांनी प्रत्येकी २ हजार शंभर व चंद्रकांत जगताप यांनी एक हजार शंभर रुपये रोख स्वरूपात देणगी दिली.

Ekta Mahila Mandal will deliver food to home where someone died jalgaon news
Jalgaon News : विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान! तरुणांसह ग्रामस्थांचे शर्थीचे प्रयत्न

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com