Jalgaon Temple Dress Code : जळगाव जिल्‍ह्यातील 30 मंदिरांमध्‍ये वस्‍त्रसंहिता? 2 मंदिरात झाले ठराव

dress code to be applied in all temple in district jalgaon news
dress code to be applied in all temple in district jalgaon newsesakal

Jalgaon Temple Dress Code : राज्‍यातील अनेक मंदिरांमध्‍ये वस्‍त्रसंहिता लागू झाली आहे. त्‍यानुसार महाराष्‍ट्र मंदिर महासंघाच्‍यावतीने जळगाव जिल्‍ह्यातील ३४ मंदिरांमध्‍ये देखील वस्‍त्रसंहिता लागू केली जात आहे. (dress code to be applied in all temple in district jalgaon news)

येत्‍या सात दिवसाच्‍या आत या सर्व मंदिरांमध्‍ये तसा ठराव करून वस्‍त्रसंहिता लागू केली जात असल्‍याची माहिती महाराष्‍ट्र मंदिर महासंघाचे समन्‍वयक प्रशांत जुवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव शहरातील ओंकारेश्‍वर मंदिर येथे आयोजित पत्रपरिषदेस ओंकारेश्वर मंदिराचे जुगलकिशोर जोशी, पारोळा येथील श्री बालाजी संस्थानचे विश्‍वस्‍त केशव क्षत्रिय, सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी देवस्थानचे सचिव निळकंठ चौधरी, श्री पद्मालय देवस्थानचे विश्‍वस्‍त डॉ. पांडुरंग पिंगळे, विधी सल्‍लागार ॲड. भरत देशमुख, सनातन संस्थेचे नंदकुमार जाधव उपस्थित होते.

जुवेकर यांनी सांगितले, की श्री बालाजी मंदिर पारोळा, ओंकारेश्‍वर मंदिर जळगाव येथे वस्‍त्रसंहिता लागू केली आहे. येथे एखादा भाविक चुकून वेगळ्या कपड्यांमध्‍ये आल्‍यास त्‍याला दर्शन घेता यावे; या करिता मंदिरात वस्‍त ठेवले आहेत. ज्‍यामुळे वस्‍त्रसंहितेचा भंग होणार नाही. यानुसारच जिल्‍ह्यातील ३४ मंदिरांमध्‍ये ठराव करून वस्‍त्रसंहिता लागू केली जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

dress code to be applied in all temple in district jalgaon news
Jalgaon News : ‘चला घ्या रे दरसन.. निंघा पंढरीले आज।’; श्री संत मुक्ताबाई राम पालखीचे पंढरपूर कडे प्रस्थान

येथे लागू होणार वस्‍त्रसंहिता

ओंकारेश्‍वर मंदिर (जळगाव), मनुदेवी मंदिर (यावल), महर्षी व्‍यास मंदिर (यावल), बालाजी मंदिर (पारोळा), पद्मालय देवस्‍थान (एरंडोल), कष्‍टभंजन देव हनुमान मंदिर (सूनसावखेडा), श्रीराम मंदिर (पारोळा), विठ्ठल रुक्मिणी मंदिर (पिंपरी, जामनेर), मारुती मंदिर (प्रजापतीनगर जळगाव), पंचमुखी मारुती मंदिर (जळगाव),

शनी मंदिर (सिंधी कॉलनी जळगाव), दक्षिणमुखी मारुती मंदिर (गोलाणी मार्केट, जळगाव), उमा महेश्‍वर मंदिर (उमाळे), शिवधाम मंदिर (जळगाव), इच्‍छादेवी मंदिर (जळगाव), कालिंका माता मंदिर (जळगाव), सूर्यमुखी हनुमान मंदिर (विवेकानंदनगर जळगाव), अष्‍टभुजा मंदिर (जळगाव), स्‍वयंभू श्री मुजूमदार गणपती मंदिर (चोपडा),

हरेश्‍वर महादेव मंदिर (चोपडा), बालवीर हनुमान मंदिर (चोपडा), नवग्रह मंदिर (शेतपुरा चोपडा), वरद विनायक मंदिर (प्रेमनगर जळगाव), गजानन महाराज मंदिर (बांभोरी), भवानी माता मंदिर (कुसुंबा, रावेर), साई मंदिर (तुळसाईनगर जळगाव).

dress code to be applied in all temple in district jalgaon news
Child Trafficking : मुलांच्या तस्करीप्रकरणी संशयितास न्यायालयीन कोठडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com