Jalgaon Winter Update : ‘अल निनो’ने थंडीच्या कडाक्याला ठेवले दूरच; रब्बीच्या उत्पादनात घट

‘अल निनो’च्या प्रभावामुळे गतवर्षी एप्रिल महिन्यातही पाऊस बरसला होता. तर मान्सूनचा पाऊस तब्बल महिनाभर उशिराने दाखल झाला.
El Nino
El Ninoesakal

Jalgaon Winter Update : ‘अल निनो’च्या प्रभावामुळे गतवर्षी एप्रिल महिन्यातही पाऊस बरसला होता. तर मान्सूनचा पाऊस तब्बल महिनाभर उशिराने दाखल झाला होता. एव्हाना पाऊसही कमी पडला. नंतर हिवाळ्यातही सलग महिना दोन महिने थंडीचा कडाका जाणवला नाही.

यामुळे थंडीच्या गारव्यामुळे येणारी गहू, दादर, ज्वारी या पिकांच्या उत्पादनही यंदा घट होणार आहे. यंदा हिवाळ्यात मोजून तीन ते चार दिवस जळगाव जिल्ह्याचे तापमान १० अंशाखाली गेले असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. (El Nino ​​did not feel of cold This reduces production of rabi jalgaon news)

गतवर्षी (२०२३) ‘अल निनो’च्या प्रभावामुळे कडक उन्हाळा, पावसाळा लांबणार असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळेच २०२३ च्या एप्रिलमध्ये पाऊस पडला होता. मे महिना कडाक्याचा होता.

तर पाऊस लांबण्याच्या शक्यतेने ऑगस्टपर्यंत पाणी टंचाई जाणवेल असा अंदाज वर्तवित जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई आराखड्यासाठी अतिरिक्त दोन कोटींची तरतूद केली आहे.

‘अल निनो’च्या प्रभावामुळे पावसाळा जूनच्या शेवटी सूरू झाला. जुलैत चांगला पाऊस बरसला मात्र पुन्हा ऑगस्ट मध्ये महिनाभराची ओढ पावसाने दिली. ऑगस्टच्या शेवटी सप्टेंबरमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला.

यामुळे खरिपाच्या पिके साठ टक्के वाचली होती. परतीचा मॉन्सून केव्हा गायब झाला याचा अंदाजही आला नाही. पावसाच्या लहरीपणामुळे खरिपात उडीद, मुगाबरोबरच कापसाचे नुकसान झाले. कोरडवाहू कपाशीचे उत्पादन अतिशय कमी आले.

El Nino
Nashik Winter Update : निफाडचा पारा घसरला; 6.5 अंश सेल्सिअस

रब्बी हंगामात थंडीच्या कडाका अधिक असतो. यामुळे शेवटचा पाऊस दमदार झाला नाही आणी थंडीचा कडाका दीड-दोन महिने राहिला तर रब्बीतील गहु, हरभरा, ज्वारी, दादर ही पिके यावर येत होती. यंदा मात्र नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या तीन महिन्यात केवळ तीन चार दिवस तापमान १० अंशावर खाली होते.

थंडीची हुडहुडी होती. सकाळी मात्र धुके, गार वारा होता. सलग महिनाभर थंडी जाणवली नसल्याचे जून जाणकार सांगतात. अल-निनोमुळे थंडीचा कडाका बेपत्ता झाला. परिणामी आता फेब्रुवारीपासूनच उन्हाची तीव्रता वाढणार आहे.

‘अलनिनो’चा प्रभाव

२०२३ मध्ये अलनिनो’चे अनेक इफेक्ट पहावयास मिळाले. त्यात पावसाळा उशिराने सुरू झाला. परतीचा पाऊस कमी पडला. गतवर्षी एप्रिल महिना उन्हाळ्याचा असताना त्यात पाऊस पडला होता.

आता हिवाळ्यात कडाक्याची थंडी अपेक्षीत असते. मात्र तिचे प्रमाणही कमी होते. आगामी काही महिने कमाल तापमान १३ते १४ अंशा तर किमान तापमान ३० ते ३५ अंश राहील, अशी माहिती हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी दिली.

El Nino
Winter Food Recipies: भाजलेले सॅल्मन फिश ते टोमॅटो तुळस सूप, हिवाळ्यासाठी खास हेल्दी सूप्स, सॅलड आणि करी

"दरवर्षी थंडीचा कडाका असतो. यंदा मात्र तसा कडाका अतिशय कमी दिवस जाणवला. थंडीवरच गहू, ज्वारी ही पिके येतात. त्यांना पाण्याची गरज नसते. गहु, ज्वारीच्या उत्पादनात यंदा घट येण्याची चिन्हे आहे. गव्हाला, ज्वारीला थंडीचे गरज असते." शेतकरी खेमचंद महाजन, असोदा

"थंडी अभावी गहू, ज्वारी, कांदा, हरभरा या पिकांना फटका बसला आहे. या पिकांचे उत्पादन कमी येईल. गव्हाला, हरभऱ्याला पोषक असे वातावरण हिवाळ्यात असते. थंडीचा कडाका वाढण्याची गरज आहे. आता तापमानात वाढ होत आहे." शेतकरी विजय झोपे, तळवेल

El Nino
Nashik Winter Update : निफाडला थंडीचा कडाका; पारा 7.4 अंशावर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com