Nashik : पाझर तलाव फुटल्याने रस्त्याला भगदाड; निकृष्ट कामाचे पितळ उघड

pazar talav demolished by heavy rainfall latest rain news
pazar talav demolished by heavy rainfall latest rain newsesakal

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : निफाड तालुक्यातील कारसूळ येथे मागील वर्षी जिल्हा परिषदेच्या (ZP) देखभाल व दुरुस्ती निधीतून केलेला पाझर तलाव (Pazar Talav) ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे फुटल्याने रौळस रस्ता वाहून गेला. या पाझर तलावाला सांडवा न काढल्यानेच हा प्रकार घडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे दळणवळ बंद झाले असून, तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. (Pazar lake burst road damaged due to heavy rain Nashik Latest Marathi News)

मार्च २०२१ मध्ये कारसूळ- रौळस रस्त्यालगत पाझर तलाव बांधण्यात आला. बांधकाम सुरू असताना तलावाचे पाणी जाण्यासाठी सांडवा काढण्याची मागणी शेतकऱ्यांसह ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र काजळे यांनी ठेकेदारासह अधिकाऱ्यांकडे केली होती.

आपण प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी यावे, अशी मागणी श्री. काजळे यांनी लघुपाटबंधारे विभागाचे तत्कालीन अधिकारी ए. व्ही. गोटे यांच्याकडे केली असता ‘इंजिनिअर मी आहे का तुम्ही’ असा प्रतीप्रश्‍न त्यांनी केला. शेतकऱ्यांनी विनंती करूनही तलावाला सांडवा न काढता पाझर तलाव पूर्ण केला.

शेवटी सोमवारी (ता. ११) रात्री मुसळधार पावसाने पाझर तलाव ओव्हर फ्लो होऊन फुटला. तलाव फुटल्यानंतर शेजारील रौळस रस्ता वाहून गेल्याने वाहतूक पुर्णपणे बंद झाली आहे. याबाबत मंगळवारी (ता. १२) शेतकऱ्यांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनत तत्कालीन बांधकाम अधिकारी श्री. गोटे यांना जाब विचारला असता आपण निवृत्त झाल्याचे सांगत जबाबदारी झटकली. तर संबंधित ठेकेदाराने आपण निविदेनुसार काम केल्याचे सांगून हात वर केले.

दरम्यान, श्री. गोटे यांच्या जागेवर आलेले लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी राजेंद्र सोनवणे यांनी तलावाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या पत्राची दखल घेत तलावाची पाहणी करून ‘सदर तलाव केव्हाही फुटू शकतो’ असा निष्कर्ष काढला.

मात्र, तलावाला सांडवा काढण्याबाबत कुठलीच भुमिका घेतली नाही. संबंधित ठेकेदाराने ५० ते ६० हजार रूपयांचे बिल रोखण्यापलिकडे कुठलीच कार्यवाही केली नाही. परिणामी, सोमवारी रात्री पाझर तलाव फुटून रौळस रस्ता वाहून गेला.

pazar talav demolished by heavy rainfall latest rain news
नाशिक : महाविकास आघाडीतर्फे सटाण्यात गांधीगिरी

जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांना निर्देश

कारसूळ- रौळस रस्ता वाहून गेल्यानंतर मंगळवारी (ता. १२) सायंकाळी देवेंद्र काजळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांची भेट घेऊन व्यथा मांडली.

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता (जिल्हा परिषद), प्रांत, तहसिलदार व पोलिसांना याप्रश्‍नी तत्काळ तोडगा काढण्याचे आदेश दिले. शिष्टमंडळात नीलेश ताकाटे, संदीप काजळे, अतुल ताकाटे, अनंत ताकाटे, संतोष जाधव, साहेबराव काजळे, भाऊसाहेब उगले, योगेश शंखपाळ, वैभव ताकाटे, विक्रम ताकाटे, प्रवीण ताकाटे आदी उपस्थित होते.

"आपण याबाबत वारंवार ठेकेदार व अधिकाऱ्यांना तलावाला सांडवा काढण्याची विनंती केली. मात्र, या बाबीकडे त्यांनी दुर्लक्षच केले. शेवटी व्हायचे तेच झाले. याप्रश्‍नी अधिकारी- ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची आमची मागणी आहे. लोकवर्गणीतून केलेल्या रस्त्याचे काम आठ दिवसांत पूर्ण न केल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबू."- देवेंद्र काजळे, ग्रा. पं. सदस्य, कारसूळ

"कारसूळ- रौळस रस्ता दुरूस्तीला अंदाजे दहा लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. याबाबत जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे प्राथमिक अहवाल सादर केला असून, लवकरच रस्ता दुरुस्ती करण्याचा प्रयत्न राहील."

- राजेंद्र सोनवणे, उप जलसंधारण अधिकारी, लघुपाटबंधारे विभाग

pazar talav demolished by heavy rainfall latest rain news
भऊर घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल; दीड कोटीची फसवणूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com