Jalgaon News : फोटोसह मतदारयाद्यांसाठी पुर्नरिक्षण कार्यक्रम जाहीर; या तारखेला अंतिम यादी होणार प्रसिद्ध

Voter list
Voter listesakal

Jalgaon News : निवडणूक आयोगाने मतदाराच्या छायाचित्रांसह मतदारयादीचा पुर्नरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Election Commission announced revision program of voter list with photographs of voters jalgaon news)

उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर उपस्थित होते. भारतीय निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे (एसएसआर-२४) चा कार्यक्रम विहित कालमर्यादित व अचूक पूर्ण करावयाचा आहे.

त्यासाठी ठरवून दिलेला कार्यक्रमात प्रथम टप्प्यात १ जून ते २० जुलैदरम्यान मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष पडताळणीची प्रक्रिया २१ जुलै ते २१ ऑगस्टदरम्यान करण्यात येणार आहे.

२२ ऑगस्ट ते २९ सप्टेंबरदरम्यान मतदान केंद्राचे तर्कशुद्धीकरण, पुनर्रचना, मतदारयादी, EPICS मधील तफावत दूर करणे, अस्पष्ट, निकृष्ट, दर्जाचे छायाचित्रे बदलून चांगल्या प्रतीची छायाचित्रे, सुनिश्चित करणे, प्रतिमा गुणवत्तेत सुधारणा करणे आणि विभागाची पुर्नरचना आणि मतदान केंद्राच्या हद्दीच्या प्रस्तावित पुर्नरचनेचे अंतिम रूप देणे आणि मतदान केंद्राच्या यादीला मंजुरी मिळविणे, अंतर ओळखणे आणि अशा तफावत भरून काढण्यासाठी कालबद्ध रननीती आखण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Voter list
Sakal Impact : पोलिस दलातील ‘छुपे-रुस्तम’ मैदानात; सोयीची ड्यूटी घेणाऱ्या सर्वांची होणार चौकशी

१ जून ते १६ ऑक्टोबरपर्यंत पुर्नरिक्षण पूर्व कार्यक्रम निर्धारित केला असून, १७ ऑक्टोबरला प्रारुप यादी, तर ५ जानेवारी २०२४ ला अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिली.

एकत्रिकृत प्रारूप यादी

३० ते १६ ऑक्टोबरदरम्यान नमुना १ ते ८ तयार करणे, १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी आणि एकत्रिकृत प्रारूप यादी तयार करणे, १७ ऑक्टोबरला एकत्रित प्रारूप मतदारयादी प्रसिद्धी करणे, १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२३ दरम्यान दावे व हरकती स्वीकारणे, दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी विशेष मोहिमेसाठी २ शनिवार आणि रविवार ठरविले आहेत.

त्यानंतर २६ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकालात काढण्यात येतील. येत्या १ जानेवारीपर्यंत अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, तसेच डेटा बेसचे अद्यायवतीकरण आणि पुरविणी याद्याची छपाई करून ५ जानेवारी २०२४ ला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करून आयोगाने निर्देश दिल्याप्रमाणे पारदर्शकतेबाबत उपाययोजना करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सांगितले.

Voter list
Health Tips : जंकफूड, सॉफ्ट ड्रिंकचे अतिसेवन करत असाल तर वेळीच सावध व्हा! नाहीतर...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com