Latest Marathi News | वीजपुरवठा खंडित ग्राहकांना नव्याने मिळणार Connection; MSEDCLची मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electricity Connection

Jalgaon : वीजपुरवठा खंडित ग्राहकांना नव्याने मिळणार Connection; MSEDCLची मोहीम

चाळीसगाव : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांना आता नव्याने वीज कनेक्शन घेता येणार आहे. यासाठी महावितरण विभाग बिलात सवलत देणार आहे. ही मोहीम दहा गावांत यशस्वीरीत्या राबविण्यात आली असून, ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

चाळीसगाव महावितरण विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील वीज ग्राहकांमध्ये जनजागृती घडविण्यासाठी एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्यात कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना वीजबिलात सवलत देऊन विलासराव देशमुख अभय योजनेंतर्गत त्यांचे वीजपुरवठा पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. (Electricity supply interruption customers get new connection Campaign of MSEDCL Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon Bambhori Bridge Impact : बांभोरी पुलाचे नव्याने Structural Audit होणार

ही मोहीम आतापर्यंत दहा गावांत राबविण्यात आली असून, ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, वीज चोरी करू नये व नियमित वीजबिल भरणा करावा, यासाठी मानव संसाधन विभागातील आणि उपविभागातील अधिकारी, कर्मचारी गावोगावी जाऊन याबाबत ग्राहकांना अवगत करत आहेत.

यात करगाव, पिंपरखेड, खडकी, तरवाडे, खरजई, टेकवडे, बहाळ, मेहुणबारे, पाटणा, चंद्रिकावाडी आदी गावांचा समावेश असून, बुधवारी सकाळी आठच्या सुमारास तालुक्यातील पिंपरखेड या गावांमध्ये उपविभाग क्रमांक दोन येथे हा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमात जनजागृती करण्यासाठी पत्रकेही वाटप करण्यात आली. दरम्यान, येत्या १२ नोव्हेंबरला होणाऱ्या लोकअदालतीचा अधिकाधिक ग्राहकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा: Jalgaon District Milk Union : 348 अर्जांची विक्री; 85 अर्ज दाखल