Jalgaon District Milk Union : 348 अर्जांची विक्री; 85 अर्ज दाखल

District President of Nationalist Cooperative Department Valmik Patil while filing candidature for the post of Director of District Milk Union
District President of Nationalist Cooperative Department Valmik Patil while filing candidature for the post of Director of District Milk Unionesakal
Updated on

जळगाव : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी बुधवार (ता. ९)अखेर ३४८ उमेदवारी अर्जांची विक्री झाली, तर ८५ अर्ज दाखल झाले आहेत. आमदार संजय सावकारे, आमदार किशोर पाटील, माजी खासदार ॲड. वसंतराव मोरे आदींनी अर्ज दाखल केले आहेत. गुरुवारी (ता. १०) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

शिवाजीनगरातील जिल्हा दूध संघाच्या कार्यालयातच निवडणूक कार्यालय आहे. उमेदवारी अर्ज घेण्यासाठी व दाखल करण्यासाठी बुधवारी गर्दी झाली होती. बुधवारी तब्बल ३२ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. आजपर्यंत एकूण ३४८ अर्जांची विक्री झाली आहे, तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अधिक गर्दी होती. तब्बल ८५ अर्ज दाखल करण्यात आले. ( Jalgaon District Milk Union Sale of 348 applications 85 applications filed Jalgaon News)

District President of Nationalist Cooperative Department Valmik Patil while filing candidature for the post of Director of District Milk Union
Jalgaon : खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर; शिवसेना ठाकरे गटातर्फे जल्लोष

दिग्गजांचे अर्ज

निवडणुकीच्या मैदानात अनेक दिग्गज उतरले आहेत. पाचोरा येथील शिंदे गटाचे आमदार किशोर धनसिंग पाटील, भुसावळ येथील भाजपचे आमदार संजय सावकारे, जिल्हा दूध संघाचे प्रभारी अध्यक्ष व माजी खासदार ॲड. वसंतराव मोरे, पाचोरा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

आज शेवटचा दिवस

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी (ता. १०) शेवटचा दिवस आहे. दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे.

District President of Nationalist Cooperative Department Valmik Patil while filing candidature for the post of Director of District Milk Union
Jalgaon Crime Update : Lotteryचे आमिष दाखवून विवाहितेची Online फसवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Hasan Mushrif Gokul Milk Union election announcement
Shaumika Mahadik Gokul Milk Union controversy
Atul Save and Yogesh Tilekar
BJP Fields Three Aspirants as Ardhapur DCC Bank Election Race Heats Up
Marathi News Esakal
www.esakal.com