Jalgaon Abhay Yojana : महापालिकेच्या ‘अभय शास्ती’ योजनेस 31 पर्यंत मुदवाढ; दिवसभरात साडेतीन कोटी कर भरणा

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal

Jalgaon Abhay Yojana : घरपट्टी थकबाकीदारासाठी महापालिकेने लागू केलेल्या अभय शास्ती योजनेची आज शेवटची मुदत होती, परंतु जनतेचा जोरदार प्रतिसाद तसेच मुदत वाढविण्याची मागणी असल्याने या योजनेची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे उपायुक्त गणेश चाटे यांनी सांगितले.

शहरातील ५१९ मालमत्ताधारकांकडे तब्बल ४ कोटी ६१ लाख रूपयांची थकबाकी होती, त्यापैकी जणांनी १७ लाख ५२ हजार ५८३ रूपयांची थकबाकी भरली होती. (Extension of Abhay Shasti Scheme of Municipal Corporation till 31 dec jalgaon news)

त्यानंतर ४८१मालमत्ताधारकाकडे ४ कोटी ४३ लक्ष ७१हजार ३१३ रूपयांची थकबाकी होती. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेचा लिलाव २२ डिसेंबरला करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी घेतला होता.

अशी होती योजना

या वेळी काही थकबाकीदारांनी आयुक्तांची भेट घेऊन आम्ही रक्कम भरण्यास तयार आहोत. आम्हाला सवलत द्यावी अशी मागणी केली. त्यांच्या मागणीनुसार आयुक्तांनी ४ डिसेंबरपासून तर १९ डिसेंबरपर्यंत थकबाकी भरण्याऱ्यांसाठी अभय शास्ती योजना लागू केली. यात व्याज व दंड माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

१२ कोटींचा भरणा

या योजनेला अत्यंत चागंला प्रतिसाद मिळाला या कालावधी तब्बल १२ कोटी रूपयांचा भरणा महापालिकेला प्राप्त झाला आहे. योजनेचा आज शेवटचा दिवस होता. आज नागरिकांचा अधिक प्रतिसाद मिळाला तब्बल साडेतीन कोटी रूपयांची थकबाकी वसूल झाली.

Jalgaon Municipal Corporation
Bhusawal Railway: भुसावळ रेल्वेत 4 महिन्यांत पायाभूत सुविधांचा विस्तार; स्वयंचलित सिग्नल व्यवस्था, लूप लाइनवर भर

मुदतवाढीची मागणी

थकबाकीदारांचा थकबाकी भरण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला तसेच काही जणांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यामुळे आयुक्तांनी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचही उपायुक्त चाटे यांनी सांगितले.

लिलाव आता जानेवारीत

थकबाकीदारांना ‘अभय शास्ती’ योजनेतर्गंत ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता जे थकबाकीदार आहेत. त्यांच्या लिलाव प्रक्रियेसही मुदतवाढ देण्यात आली आहे. आता जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लिलाव करण्यात येणार आहे.

थकबाकीदारांनी फायदा घ्यावा

घरपट्टी थकबाकीदारांना अभय शास्ती योजनेतर्गंत आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जे थकबाकीदार असतील त्यांनी योजनेचा फायदा घ्यावा आपली थकबाकी भरून व्याज दंड टाळावा. तसेच लिलावही टाळावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड व उपायुक्त गणेश चाटे यांनी केले आहे.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon News: पिंप्राळा पुलाची कोनशिला तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; खडसेंचे नाव असल्याने सत्ताधाऱ्यांचा राग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com