किनोदमध्ये बनावट दारुसाठा जप्त; राज्य उत्पादन विभागाची धडक कारवाई

Fake liquor seized
Fake liquor seizedesakal
Updated on

जळगाव : तालुक्यातील किनोद येथे बसस्थानकावरील यशपाल हॉटेलमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला. त्यात ६६ हजार १३० रुपये किमतीच्या बनावट देशी, विदेशी दारुच्या ९३८ बाटल्या आढळून आल्या.

याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे. अशोक भिला सोनवणे (वय ४२, रा.चांदसर, ता.धरणगाव ह.मु.कांचननगर, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. (Fake liquor seized in Kinod Strike action of State Production Department Jalgaon latest marathi news)

Fake liquor seized
Dhule : सावकार बंब बंधूंवर दोषारोपपत्र दाखल

जळगाव तालुक्यातील किनोद येथे बसस्थानकावरील यशपाल हॉटेलमध्ये बनावट मद्याची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी रात्री उशीरा या हॉटेलवर छापा मारला असता देशी व विदेशी मद्याच्या ९३८ बाटल्या मिळून आल्या.

ही दारु बनावट असल्याचे निष्पन्न झाले. विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ व अधीक्षक जितेंद्र गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक सी. एच. पाटील, दुय्यम निरीक्षक ए. एस. पाटील, एस. आर. शेलार, एस. बी. भगत, सतीश पाटील यांच्यासह पोलिस नाईक एन. व्ही. पाटील, ए. व्ही. गावंडे, एम. डी. पाटील, के. पी. सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Fake liquor seized
मत्स्यपालनामधून तरुणांकडून लाखोंचे उत्पादन; बायोफ्लॉक फिश फार्मिंग प्रकल्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com