esakal | चांगली बातमी: अतिवृष्टी च्या नुकसानीची मदत 94 टक्के शेतकऱ्यांना वाटप 
sakal

बोलून बातमी शोधा

चांगली बातमी: अतिवृष्टी च्या नुकसानीची मदत 94 टक्के शेतकऱ्यांना वाटप 

मदत थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश यंत्रणांना देण्यात आले होते.त्यानुसार जळगाव जिल्ह्यासाठी 18 कोटी 80 लाख 10 हजार रूपयांची आर्थिक मदत प्राप्त झाली होती.

चांगली बातमी: अतिवृष्टी च्या नुकसानीची मदत 94 टक्के शेतकऱ्यांना वाटप 

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव :  जिल्ह्यात जुन ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील 94 टक्के शेतकर्‍यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. 

आवश्य वाचा- भितीच संपली राव ! ठाण्यात पोलीसांसमोरचं ढिश्‍युम..ढिश्‍युम 

जिल्ह्यात जुन ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते. शेतकर्‍याच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. परिणामी राज्य शासनाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांसाठी दिवाळीपुर्वी विशेष आर्थिक मदत जाहीर केली होती. ही मदत थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश यंत्रणांना देण्यात आले होते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यासाठी 18 कोटी 80 लाख 10 हजार रूपयांची आर्थिक मदत प्राप्त झाली होती. जिल्हा प्रशासनाकडे ही मदत प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने तात्काळ बीडीएसद्वारे तहसीलदारांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली. तहसीलदारांनाही ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील 41 हजार 898 शेतकर्‍यांच्या खात्यावर 17 कोटी 60 लाख 90 हजार 195 रूपये वर्ग करण्यात आले. जिल्ह्यातील एकुण 94 टक्के शेतकर्‍यांना रक्कम वितरीत करण्यात आली आहे. 

आवर्जून वाचा- नाव न घेता एकनाथ खडसे - गिरीश महाजनांची ‘तीरंदाजी’ तीव्र !
.

तालुकानिहाय वितरीत रक्कमेची टक्केवारी 
भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर आणि चोपडा तालुक्यातील शेतकर्‍यांना 100 टक्के नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले आहे. तर जळगाव तालुक्यात 92.63, जामनेर 99.93एरंडोल 86.85, धरणगाव 90.28, पारोळा 98.33, यावल 95.88, रावेर 89.83, अमळनेर 96.26, पाचोरा 86.87, भडगाव 99.98 आणि चाळीसगाव तालुक्यात 97.40 टक्के भरपाईचे वाटप करण्यात आले आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे