Latest Marathi News | शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sucide Case

Jalgaon News : शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

चाळीसगाव : देवळी (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी ७२ वर्षीय शेतकऱ्याने शेतात विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी सहाच्या सुमारास घडली. विक्रम शिवराम पाटील यांना दोन मुले असून ती मुकबधीर आहेत.

त्यांची देवळी -डोण रस्त्यावर अवघी दोन एकर कोरडवाहू शेती असून त्यावर त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालायचा. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी खासगी सावकारांसह बॅंकेकडूनही काही कर्ज घेतले होते. (Farmer commits suicide due to debt Jalgaon News)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच...

हेही वाचा: Nashik News : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांचा Action Plan

कर्जाची परतपेढ केली जात नसल्याने विक्रम पाटील हे गेल्या काही दिवसांपासून व्यथित होते. आज पहाटे सहाच्या सुमारास ते शेतात गेले. सुरवातीला त्यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न असफल झाल्याने त्यांनी विषारी द्रव्य प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपवली.

बराच वेळ होऊनही विक्रम पाटील घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने आपल्या पुतण्याला त्यांना पाहण्यासाठी शेतात पाठवले असता, विक्रम पाटील यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे उघडकीस आले.

कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने या घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, सुनील व शरद पाटील हे दोन मुकबधीर मुले आहेत.

हेही वाचा: SAKAL Impact News : उद्यानांच्या समस्यांच्या निराकरणास प्रारंभ!