Crop Laon : पीकविमा रुपयाचा, खर्च येतोय 100; चोपड्यात आर्थिक लूट

crop loan
crop loanesakal

Crop Laon : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना जाहीर केलेली आहे. मागील वर्षापर्यंत पीक विमा हा त्या त्या गावातील विकास सोसायटींमार्फत काढला जात होता.

त्यासाठी जिल्हा बँकेकडून पैसे परस्पर वर्ग देखील होत होते. यावर्षी मात्र जिल्हा बँकेने एक रुपयाच्या पीक विम्याला पंधरा रुपये खर्च येणार असल्याने नकार दिला आहे. (farmer have to be spent 80 to 100 rupees to get one rupee crop insurance at setu centre jalgaon news)

त्यामुळे शेतकऱ्यांना पर्याय म्हणून सेतू केंद्रांकडे जावे लागत आहे. मात्र, सेतू केंद्रांवर एक रुपयाच्या पीक विमा काढण्यासाठी ८० ते १०० रुपये खर्चा करावे लागत आहे. शेतकऱ्यांची ही आर्थिक लूट सुरू असल्याच्या प्रतिक्रिया सध्या उमटत आहेत. या प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी होत आहे.

पीक विमा कंपनीकडून ज्या शेतकऱ्यांचा एक रुपयात पीक विमा काढला जाईल, अशा शेतकऱ्यांचा प्रत्येकी ४० रुपये खर्च हा इन्शुरन्स कंपनी सेतू केंद्राला देणार आहे. मात्र, सेतू केंद्रांवर या विम्यासाठी शेतकऱ्यांकडून शंभर रुपये सर्रास घेतले जात आहेत. नाही दिले तर शेतकऱ्यांना काहीही कारण सांगून टाळले जाते.

वास्तविक, नेहमीप्रमाणे एक रुपयात हा पीक विमा असला तरी तो जिल्हा बँकेमार्फतच काढला जाणे आवश्यक होते. सध्या शेती कामे सुरु झालेली असताना शेतकऱ्यांना या विम्यासाठी गावापासून शहरातील सेतू केंद्रावर यावे लागत आहे. कामधंदे सोडून शहरात यावे लागत असल्याने शेतकऱ्यांचे शेतीकामाचे नियोजन कोलमडत असून त्यांचा आर्थिक खर्चही होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

crop loan
Crop Loan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीक कर्ज वाटपाचे ४०० कोटी शिल्लक; नूतनीकरणाची उद्या शेवटची संधी

आर्थिक लूट थांबवावी

शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी कृषी अधिकाऱ्यांमार्फत सेतू केंद्रांना केवळ पीक विम्याची रक्कम एक रुपया घ्यावी, त्या बदल्यात शेतकऱ्यांकडून पैसे घेऊ नये असे स्पष्टपणे कळविले आहे.

मात्र, तरीही सेतू केंद्रांवर शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात आहेत. विशेष म्हणजे, या संदर्भात तक्रारी करुनही कोणीच दखल घेत नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. या प्रकारामुळे ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ या म्हणीचा प्रत्यय सध्या शेतकऱ्यांना येत आहे. शेतकऱ्यांची ही लूट थांबवावी, अशी मागणी होत आहे.

शासनाचे दुर्लक्ष, शेतकरी वाऱ्यावर

पीक विम्याची अंतिम मुदत ३१ जुलै असल्याने शेतकऱ्यांना आपली सर्व कामे बाजूला सारुन कागदपत्रांची जुळवाजुळव करून सेतू केंद्रावर जावे लागत आहे.

crop loan
Inspirational News : दोन्ही हात गमावूनही आयुष्याच्या लढाईत अव्वल! देशातील पहिले दिव्यांग वाहन परवानाधारक...

‘ऑनलाइन’च्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी साधा एक फॉर्म भरून सोसायटीच्या सचिवांकडे जमा केला असता आणि सचिवांनी सेतू केंद्रांवर येऊन ही प्रक्रिया केली असती, तर शेतकऱ्यांना पायपीट करण्याची गरज पडली नसती असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मूळात शासनाचे दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

"सेतू केंद्रांवर फक्त एक रुपया घेण्याची सक्त सूचना दिलेली आहे. शेतकऱ्यांनी एक रुपयाचा पीक विमा काढण्यासाठी जर सेतू केंद्रांवर संपर्क केला किंवा प्रत्यक्ष भेट दिली तरी त्यासाठी सेतू केंद्रांनी केवळ एक रुपयाच घ्यावा. जास्तीचे पैसे घेऊ नयेत, ज्या सेतू केंद्रावर जास्तीचे पैसे घेतले जात असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल."- भाऊसाहेब थोरात, तहसीलदार चोपडा

crop loan
Jalgaon News : ‘लेटलतीफ’ सरकारी बाबूंना दणका; अधिकाऱ्यांसह 10 कर्मचाऱ्यांना नोटीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com