Jalgaon Agriculture News : रब्बीचा विमा एक रुपयात ज्वारीसाठी 30 नोव्हेंबरची मुदत

Farmers started taking insurance for rabi crop
Farmers started taking insurance for rabi crop esakal

Jalgaon Agriculture News : जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत रब्बी पिकांसाठी विमा काढण्यास शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. खरीप पीक विम्याप्रमाणेच रब्बी पिकांसाठीदेखील शेतकऱ्यांचा हिस्सा शासनाकडून दिला जाईल.

शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरावा लागणार आहे. या विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रभारी कृषी अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे. (Farmers started taking insurance for rabi crops jalgaon agriculture news)

शेतकऱ्यांनी पीकविमा काढला तर पिकांना विम्याचे संरक्षण मिळते, त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळू शकते. त्यामुळे पीकविमा काढणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे.

त्यातच आता पीकविम्याचा हप्ता शासनाकडून भरला जाणार आहे. खरीप पीक विमा जिल्ह्यात ४ लाख ५४ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता.

ज्वारीचा पीक विमा काढण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंतची मुदत आहे. हरभरा, गहू व रब्बी कांद्यासाठी १५ डिसेंबरपर्यंतची मुदत

भात, उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्चपर्यंत विमा काढता येणार ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदारांच्या व्यतिरिक्त भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.

Farmers started taking insurance for rabi crop
Jalgaon Agriculture News : विषाणूजन्य केळीबागांची शास्त्रज्ञांकडून पाहणी; केळीवर ‘सीएमव्ही’चा प्रसार

नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळू शकते.

ही कागदपत्रे आवश्‍यक...

शेतकरी आपला पीक विम्याचा अर्ज सीएससी केंद्रावर जाऊन भरू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना पीकविमा भरताना आधारकार्ड, आधार नोंदणीची प्रत सातबारा उतारा, भाडेपट्टीची शेती असेल तर त्यासाठीचा करारनामा, सहमती पत्र, पीक पेरणी स्वयंघोषणापत्र आणि पासबुकची प्रत सादर करून इलेक्ट्रॉनिक साक्षांकन करणे बंधनकारक आहे.

पीक विमा भरताना शेतकऱ्यांनी आपला बँकेचा खाते क्रमांक, पिकाखालील क्षेत्र, भूमापन क्रमांक इत्यादीची खातरजमा करावी.

Farmers started taking insurance for rabi crop
Jalgaon Agriculture News : शेती टिकविण्यासाठी चळवळीत सहभागी व्हा : खासदार उन्मेष पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com