थंडीचा कडाक्यामूळे गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचा पेऱ्यात वाढ

थंडीचा कडाक्यामूळे गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचा पेऱ्यात वाढ
Updated on

 
तांदलवाडी (ता.रावेर) : ग्रामीण भागात काही दिवसांपासुन पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. सकाळी व संध्याकाळी थंडी तर, दुपारच्या वेळेस वातावरणात उष्णता जाणवू लागत आहे. कडाक्याची पडणारी थंडी गहू, हरभरा अशा रब्बी पिकांसाठी लाभदायी आहे.

थंडीपासुन संरक्षण होण्यासाठी नागरिक ठिकठिकाणी शेकोटीचा आधार घेताना दिसुन येत आहे. थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने सकाळच्या प्रहरी व्यायाम करण्यासाठी, फिरण्यासाठी अबाल वृद्ध रस्त्याने फिरताना दिसुन येत आहे.

हरभऱ्याच्या पेऱ्यात वाढ
यंदा चांगल्या प्रमाणात पाऊस पडल्याने, भूगर्भातील पाणी पातळीतही चांगली वाढ झाली आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू ही पिके जोमाने वाढली आहेत. रब्बी हंगामात यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कडाक्याची थंडी रब्बी हंगामाला पोषक असल्याने पिकांची वाढ जोमाने होतांना दिसत आहे.

शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या

थंडीने जोर पकडल्याने रब्बी हंगामाकडून शेतकऱ्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गहू व हरभरा पिकांना पाणी देण्याची लगबग सुरु आहे. परिसरात सध्या हरभऱ्याचे पिक बहरले असुन हिरवी घाटे वाटसरुंचे लक्ष वेधून घेत आहे. मागील वर्षी गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याला जास्त भाव असल्याने शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी जास्त प्रमाणात केली.
 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Yogesh Nemade
Marathi News Esakal
www.esakal.com