रील स्टार लेकाची हत्या करून वडिलांनी स्वत:ला संपवलं; चिठ्ठीत लिहिलं, मुलाचा खून केलाय, धरणात पुरलंय

Vicky Patil Murder Case : मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह धरणात पुरला आणि त्यानंतर माजी सैनिक असलेल्या बापाने जीवन संपवलं. सुसाइड नोटमध्ये आपण मुलाचा मृतदेह धरणात पुरल्याचं म्हटलंय.
Vicky Patil Murder Case
Vicky Patil Murder Case Esakal
Updated on

जळगावमध्ये रील स्टार असलेल्या २२ वर्षीय मुलाचा खून करून वडिलांनीही आत्महत्या केलीय. धक्कादायक बाब म्हणजे मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह धरणात पुरला आणि त्यानंतर माजी सैनिक असलेल्या बापाने जीवन संपवलं. सुसाइड नोटमध्ये आपण मुलाचा मृतदेह धरणात पुरल्याचं म्हटलंय. विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील असं तरुणाचं नाव आहे तर विठ्ठल सखाराम पाटील असं आत्महत्या केलेल्या वडिलांचं नाव आहे. धरणगाव एरंडोल तालुक्यात भोरखेडा इथं ही घटना समोर आलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com