Latest Marathi News | मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dog News

Jalgaon News : मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीती

जळगाव : शहरातील सर्वच भागांत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. मेहरूण भागात एका लहान मुलाला चावा घेतला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत आम आदमी पक्षातर्फेही निवेदन देण्यात आले.

शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे काही भागात रस्त्यावर फिरणेही कठीण झाले आहे. रात्री रस्त्यावर कुत्र्यांची घोळके बसलेले असतात. ते वाहनधारकांच्या अगावर धावून जातात. (Fear among citizens due to loose dogs Jalgaon News)

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

हेही वाचा: Jalgaon News : फुकट्या प्रवाशांकडून २३ लाख वसूल

त्यामुळे अनेक वेळा अपघात झाले आहेत. अनेक लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. मेहरूण परिसरातील मास्टर कॉलनी भागात फिरजा नवीद शेखसर या लहान बालकालाही कुत्र्याने चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

नागरिकांचे निवेदन

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत आम आदमी पक्षाने निवेदन दिले आहे. त्यात उच्च न्यायालयाने दिलेला आदेशाही दाखला दिला आहे. मोकाट कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणीही केली आहे. अमिता नेरकर, रईस कुरेशी, आरिफ खान, नाजीम कुरेशी, विजय दानीज, अनिल वाघ, लुकमान लोखंडवाला, शबाना पटेल आदींची त्यावर स्वाक्षरी आहे.

मक्ता देऊनही...

शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने मक्ता दिला आहे. मात्र, मक्तेदार काम करीत नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा व मक्तेदाराकडे लक्ष द्यावे. ते काम करीत नसतील, तर त्यांचा मक्ता रद्द करावा, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा: Jalgaon News : आमदार चव्हाण अध्यक्षपदी बिनविरोध

टॅग्स :JalgaonStray Dogs