
Sports News : बाळासाहेब ठाकरे कबड्डी करंडक स्पर्धेचे आज अंतिम सामने
जळगाव : हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (ठाकरे गट) जळगाव महानगर आणि कैलास क्रीडा मंडळातर्फे बाळासाहेब ठाकरे भव्य कबड्डी स्पर्धेत सोमवारी (ता. २३) महिला व पुरुष गटाचे अंतिम सामने होणार आहेत.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवस शिवतीर्थ मैदानावर या स्पर्धेचे साखळी व उपउपांत्य फेरीचे सामने झाले. स्पर्धेत महिलांच्या चार संघांनी उपांत्य फेरीत मजल मारली, तर रात्री उशिरापर्यंत पुरुषांच्या उपउपांत्य फेरीचे सामने खेळविले जात होते. (Final match of Balasaheb Thackeray Kabaddi Trophy today Jalgaon News)
मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय
हेही वाचा: SPORTS News : ‘खेलो इंडिया गेम’ मध्ये संस्कृती करणार राज्याचे प्रतिनिधित्व
उपउपांत्य फेरीमध्ये प्रेक्षकांनी खास करून तरुणांनी सर्व खेळाडू व आयोजकांचा उत्साह वाढविला. जवळजवळ तीन हजारांवर प्रेक्षक प्रेक्षालयात उपस्थित होते. सोमवारी उपांत्य आणि अंतिम सामना होणार आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर येऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन स्पर्धेचे आयोजक शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांनी केले आहे.
उपउपांत्य फेरीत पोचलेले पुरुष संघ : शिवनेरी क्रीडा मंडळ, आर. सी. पटेल (शिरपूर), कैलास क्रीडा मंडळ, महर्षी वाल्मीक संघ, एनटीपीएस (नंदुरबार), नेताजी सुभाष मंडळ, महर्षी फाउंडेशन, क्रीडा रसिक मंडळ. उपांत्य फेरीत पोहोचलेले महिला संघ : स्वामी स्पोर्ट्स (रावेर), एकलव्य संघ (जळगाव), जय मातृभूमी संघ (भुसावळ), आर. सी. पटेल संघ (शिरपूर).
हेही वाचा: Nashik Crime News : महिलेच्या घरावर पेट्रोल टाकून जाळपोळीचा प्रयत्न; 4 संशयित कोयत्यासह ताब्यात