SPORTS News : ‘खेलो इंडिया गेम’ मध्ये संस्कृती करणार राज्याचे प्रतिनिधित्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanskr̥ti Singade News

SPORTS News : ‘खेलो इंडिया गेम’ मध्ये संस्कृती करणार राज्याचे प्रतिनिधित्व

कोकणगाव : मध्य प्रदेशात होणाऱ्या पाचव्या खेलो इंडिया गेममध्ये कोकणगावची सुवर्णकन्या संस्कृती सोमनाथ शिंगाडे महाराष्ट्रचे प्रतिनिधित्व करणार असून, तिच्या निवडीबद्दल गावात आनंदाचे वातावरण आहे.

संस्कृतीच्या घरची परिस्थिती जेमतेम आहे, पण कुठल्याही परिस्थितीत आपले लक्ष्य डगमगू नये, यासाठी तिने अपार मेहनत घेतली आहे. वेळोवेळी क्रीडाप्रमुख हेमंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. रोज ती सरावासाठी कोकणगावतील कादवा नदीवर बोटिंगसाठी येते. (In Khelo India Game Kokangaon Sanskruti Shingade represent state Nashik News)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Nashik Crime News : महिलेच्या घरावर पेट्रोल टाकून जाळपोळीचा प्रयत्न; 4 संशयित कोयत्यासह ताब्यात

कोविड काळात तिच्या आईचे निधन झाले. त्या परिस्थितीत वडील सोमनाथ शिंगाडे यांनी स्वतःला धीर देत तिला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून तिने आपल्या यशाला गवसणी घातली. सध्या ती पिंपळगाव बसवंत येथील के. के. वाघ महाविद्यालयात प्रथम वर्षे बी. कॉम.मध्ये शिकत आहे.

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनतर्फे झालेल्या नौकानयन स्पर्धेत तिला सुवर्णपदक मिळवून गावचेच नाही, तर पंचक्रोशीचे नाव उज्ज्वल केले.

देशसेवेसाठी पोलिस, सैनिक व आशियाई स्पर्धेत जाण्याचे तिचे स्वप्न आहे. या यशामागे पिंपळगाव महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शिंदे, क्रीडाप्रमुख पाटील तसेच कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे.

हेही वाचा: NDCC Bank News : माजी संचालकांची उद्या सहकारमंत्र्यांकडे सुनावणी

टॅग्स :Nashiksports