Theater Festival : ‘वेग्गळं असं काहीतरी’ नाटक ठरले चतुर्थ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drama News

Theater Festival : ‘वेग्गळं असं काहीतरी’ नाटक ठरले चतुर्थ

जळगाव : नागपूर येथे झालेल्या तेराव्या औद्योगिक नाट्यमहोत्सव अंतिम फेरीत जळगाव येथील कलादर्श स्मृतिचिन्हतर्फे सादर करण्यात आलेल्या ‘वेग्गळं असं काहीतरी’ या नाटकाला चतुर्थ

क्रमांकाचे पारितोषिक (Prize) व नाटकातील कलावंत पद्मनाभ देशपांडे यांना अभिनयाचे प्रमाणपत्र मिळाले. (final round of Thirteenth Industrial Theater Festival the play vegla asa kahitari presented won fourth prize jalgaon news)

नागपूरच्या राजे रघुजीनगरमधील कामगार भवनात झालेल्या अंतिम फेरीतील नाट्यमहोत्सवात संपूर्ण राज्यभरातून २८ नाटकांचा समावेश होता.

या नाट्यमहोत्सवात जळगाव येथील कलादर्श स्मृतिचिन्हतर्फे सादर करण्यात आलेल्या हेमंत कुलकर्णी लिखित ‘वेग्गळं असं काहीतरी’ या नाटकात पद्मनाभ देशपांडे, मंजूषा भिडे, दीप्ती बारी, योगेश शुक्ल, गणेश बारी, धनंजय धनगर, आशिष राजपूत यांचा सहभाग होता.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

नाटकाचे नेपथ्य सचिन आढारे, प्रकाशयोजना जयेश कुलकर्णी, पार्श्वसंगीत अम्मार मोकाशी, सुहानी बारी, रंगभूषा श्रद्धा शुक्ल यांचा सहभाग होता. नाट्यमहोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी प्रभाकर दुपारे, किशोर डाऊ, नरेंद्र आमले, सुधाकर गिते, रूपाली कोंडेवार मोरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.