Jalgaon News : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर लागला पथदीप! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stree Light

Jalgaon News : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर लागला पथदीप!

पाचोरा (जि. जळगाव) : येथील गजबजलेल्या गो. से. हायस्कूल रस्त्यावरील वीज खांबावर पथदीपांची वर्षभरापासूनची मागणी पूर्णत्वास आल्याने परिसरातील रहिवासी व दुकानदारांतर्फे आनंद व्यक्त होत आहे. (finally street light restored after one year Jalgaon News)

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

हेही वाचा: Nylon Manja Ban : खबरदार! नायलॉन मांजा विकाल तर थेट तडीपार व्हाल!

गिरडकडे जाणाऱ्या रस्त्यावर व्यापारी संकुल, गो. से. हायस्कूल, न्यायालय, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व खत कारखाना आहे. या रस्त्यावर दिलीप मोर यांच्या घरासमोरच्या वीज खांबावरील दिवा गेल्या वर्षभरापासून बंद होता.

त्यामुळे अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. अंधारामुळे अपघात, हानी, चोरी, छेडखानी असे प्रकार होत असल्याने अनेकदा पालिका तसेच वीज वितरणकडे पथदीप लावण्यासंदर्भात मागणी केली. परंतु कार्यवाही होत नसल्याने दिलीप मोर यांनी सामाजिक कार्यकर्ते अनिल येवले यांना या संदर्भात माहिती दिली.

श्री. येवले यांनी पालिका व वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत धारेवर धरले. अंधारामुळे अपघात, हानी, चोऱ्या, छेडखानी सुरू ठेवायची आहे का0? असा जाब विचारून या संदर्भात आंदोलनाची तयारी दर्शवली. त्यामुळे पालिकेने मंगळवारी (ता.१०) सकाळी येथे दिवा लावला. यामुळे दुकानदार, रहिवासी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, शिक्षक व या रस्त्याने ये -जा करणाऱ्या गिरड परिसरातील वाहनचालकांनी आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा: SAKAL Exclusive : प्राथमिक शिक्षकांच्या मदतीला Vinoba App!

टॅग्स :Jalgaonstreet light