Jalgaon News : जिल्ह्यात प्रथमच आढळली करड्या कंठाची पांगळी; पक्षीमित्रांच्या अभ्यासातून नोंद

Shelgaon Dam (St. Yaval) : Grey-throated Lame Bird found.
Shelgaon Dam (St. Yaval) : Grey-throated Lame Bird found.esakal

Jalgaon News : करड्या-कंठाची पांगळी (Gray-throated Martin (Riparia chinensis) या जातीच्या पक्ष्याची जळगाव जिल्ह्यात प्रथमच नोंद करण्यात आली.

याबाबत पक्षीमित्र तथा अभ्यासक राजेंद्र गाडगीळ यांनी ‘सकाळ’ला माहिती दिली. गुरुवारी (ता. १५) या पक्ष्याची नोंद होण्यापूर्वी आम्ही ३१ मे २०२३ ला शेळगाव पाटबंधारा, यावल रोड परिसरात पक्षी निरीक्षणासाठी गेलो असता, त्याठिकाणी ही पांगळी पहिली. (first time in district Gray throated Martin Riparia chinensis found Traffic in Shelgaon Dam area Notes from birdwatchers studies Jalgaon News)

प्रथम दर्शनी आम्हास साधी पांगळी (Plain Martin) वाटली, पण घरी आल्यावर नीट निरीक्षण केल्यावर आम्हास ही साधी पांगळी नसल्याचे लक्षात आले.

ई-बर्डकडून केला खुलासा

ही नक्की कोणत्या जातीची पांगळी आहे, याची पडताळणी करण्यासाठी e-Bird निरीक्षकांकडे पाठवली असता, हा पक्षी साधी पांगळी (Plain Martin) या पक्ष्याची उपजात असून, ती करड्या-कंठाची पांगळी (Grey-throated Martin ) या नावाने ओळखली जाते.

या करड्या-कंठाची पांगळीची जळगाव जिल्ह्यात प्रथमच नोंद झालीय. रिचर्ड ग्रीमिटच्या नव्या आवृत्ती पुस्तकात हा पक्षी नव्याने समाविष्ट करण्याची गरज आमच्या लक्षात आल्याचे श्री. गाडगीळ म्हणाले.

याबाबत खात्री करण्यासाठी आम्ही शुक्रवारी पुन्हा त्या बंधाऱ्याला भेट दिली, तेव्हा ही जात करड्या-कंठाची पांगळी (Grey-throated Martin) आहे, याची खात्री झाल्याचे पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ म्हणाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shelgaon Dam (St. Yaval) : Grey-throated Lame Bird found.
Jalgaon MIDC News : जळगावला नवीन औद्योगीक वसाहत; 2 आठवड्यात अंतिम सर्वेक्षण

पक्ष्याची वैशिष्ट्ये

करड्या-कंठाची पांगळी शेतजमीन, गवताळ प्रदेश आणि सवाना यांसारख्या खुल्या अधिवासात आढळतात. या सहसा पाण्याजवळ प्रामुख्याने संथ वाहणाऱ्या नद्या, तलाव, ओले गवताळ प्रदेश आणि इतर पाणथळ अधिवासाच्या आसपास आढळतात.

या बहुतेक वेळा हवेत दिसतात. मात्र, प्रजनन काळात कधी कधी तारांवर किंवा जमिनीवर किंवा उंच कडांवर बसलेले असतात. अन्य पांगळी/पाकोळी (Martin/Swallow) प्रमाणे हा उडता

उडता किडे खातो. ही पांगळी ताजिकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारतीय उपखंडापासून दक्षिण चीन, तैवान आणि उत्तर फिलीपिन्सपर्यंत आढळत असून, भारतात गुजरात, राजस्थान, मध्य ते पूर्व भारत या प्रदेशात मुख्यत्वे आढळते. महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांत हे पक्षी आढळून येतात, असेही गाडगीळ दांपत्य म्हणाले.

Shelgaon Dam (St. Yaval) : Grey-throated Lame Bird found.
Jalgaon Crime : 4 लाखांचे सोने घेऊन चोरटे पसार; सराफा रिफायनरी फोडली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com