esakal | प्रथमच मिळालेल्या स्पोर्ट गणवेशाने हरखुन गेली आदिवासी बालके
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon

प्रथमच मिळालेल्या स्पोर्ट गणवेशाने हरखुन गेली आदिवासी बालके

sakal_logo
By
प्रा.हिरालाल पाटील

कळमसरे : गोवर्धन ता.अमळनेर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक मनवंतराव भीमराव साळुंखे हे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद शिक्षण सुरु अंतर्गत सतत " विद्या वरदान " उपक्रम राबवितात. त्या अंतर्गत मागे याच बालकांना त्यांनी स्वयंअध्ययनासाठी परिपुर्ण प्राथमिक शैक्षणिक साहित्य वाटप केले होते.

त्यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा या हेतुने त्यांचे प्रयत्न सुरु असतात. यावर्षी पालकांबरोबर ऊसतोड कामावर न जाता शाळा उघडली तर शाळेत जावु ,किंवा शिक्षकांच्या मदतीने अभ्यास करू हे सांगितल्यावर साळुंखे यांनी त्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी सुंदर स्पोर्ट प्रकारातील गणवेश भेट देण्याचे ठरविले .

शिक्षक श्री.साळुंखे यांनी त्यांचे मित्र पारोळा येथील आकाश मॉलचे संचालक अल्पेश जैन यांच्या जवळ ही संकल्पना मांडली . त्यांनी नेहमी प्रमाणे उदार दातृत्व दाखवत निआ एजन्सीचे संचालक विक्रांत उर्फ विक्की लुणावत यांनी गोवर्धन येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारे ८२ विद्यार्थ्यांना स्पोर्ट गणवेश भेट दिली.

हेही वाचा: कामास गती न मिळाल्यास पुन्हा रस्त्यावर - चिमणराव पाटील

या कार्यक्रमाला पारोला येथील जळगाव जिल्हा पोलीस महिला दक्षता समितिच्या सदस्या चित्रा साळुंखे , पारोळा तालुकाध्यक्ष कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र सिद्धराज साळुंखे ,यांच्या हस्ते हे गणवेश वाटप करण्यात आले.

उपक्रमाला गोवर्धनचे उपसरपंच प्रविण पाटील , सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण पाटील , दिपक पाटील , नरेंद्र पाटील , गोवर्धन शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सरदार गायकवाड , उप शिक्षिका कल्पना सनांन्से उपस्थित होते. मनवंतराव साळुंखे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले .

loading image
go to top