esakal | कामास गती न मिळाल्यास पुन्हा रस्त्यावर - चिमणराव पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon

कामास गती न मिळाल्यास पुन्हा रस्त्यावर - चिमणराव पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पारोळा : राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 च्या चौपदरीकरणाचे काम अतिशय संथ गतीने व निकृष्ट दर्ज्याचे सुरु असून सद्यस्थितीत अजंग ते तरसोद ह्या टप्प्यात नव्या व जुन्या दोन्ही महामार्गांवर रस्त्याला खोलवर मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे दिवसाला अनेक अपघात होवून मोठी जिवितहानी होत आहे. खराब रस्त्यावर किंवा काम सुरु असल्याचा बऱ्याच ठिकाणी सूचना फलक अथवा मार्गदर्शन चिन्ह देखील लावलेले नाहीत. त्यामुळे रहदारी करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

म्हणून सदरील कामाला गती मिळावी, रस्त्यावर पडलेले खोलवर खड्ड्यांना तात्काळ उच्च दर्जाच्या कामाने डागडूगी करण्यात यावी, निकृष्ट दर्जाच्या होत असलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी महामार्गाच्या बायपास रस्त्यावर रास्ता रोको करुन महामार्गाच्या सुरु असलेल्या निष्क्रिय कामाचा निषेध व्यक्त केला.

गेल्या वर्षापासुन महामार्गाचे काम सुरु आहे.मात्र कामाला गती न मिळणे कामात क्लाँलिटी नसणे याबाबत संबंधित अधिकार्यांना वारंवार सुचना करुन देखील ते चालढकल करित असल्यामुळे त्यांच्या या हलगर्जीपणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

हेही वाचा: पाटील की पटेल? गुजरात मुख्यमंत्रीपदासाठी BJP कुणाला देणार संधी

विचखेडे गावाजवळील बाभोटी नाल्याजवळ खोलवर खड्ड्यामुळे दोन बैल दगावली.यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले.अनेक हायवेलगत असलेल्या शेतकर्यांना आज देखील मोबादला मिळाला नसल्याने आपण हे आंदोलन करत असुन महामार्गाचे काम वेळेवर पुर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईलने पुन्हा आपण रस्त्यावर उतरु असा इशारा आमदार चिमणराव पाटील यांनी दिला.यावेळी महामार्गाच्या संबंधित अधिकार्यांनी कामास गतीमानता व चांगले प्रकार करण्याचे लेखी आवाहन दिल्याने तब्बल 1 तास सुरु असलेले आंदोलन थांबविण्यात आले.

यावेळी कृऊबा समितीचे सभापती अमोल पाटील, पारोळा शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील, एरंडोल तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, पारोळा शहरप्रमुख अशोक मराठे, युवासेना उपजिल्हाप्रमुख विवेक माळी, एरंडोल शहरप्रमुख कुणाल महाजन, युवासेना पारोळा तालुकाप्रमुख मिलिंद पाटील, एरंडोल तालुकाप्रमुख बबलु पाटील, युवासेना शहरप्रमुख आबा महाजन, तहसिलदार अनिल गवांदे, पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, बाजार समिती उपसभापती दगडु पाटील, संचालक चतुर पाटील, मधुकर पाटील व सर्व संचालक मंडळ, शेतकी संघ चेअरमन अरूण पाटील, व्हा.चेअरमन सखाराम चौधरी व सर्व संचालक मंडळ, माजी .जि.प.सदस्य दिनकर पाटील, संजय पाटील, उपशहरप्रमुख शुभम शिंपी, उपतालुकाप्रमुख समाधान मगर, एरंडोल पंचायत समिती उपसभापती विवेक पाटील, देवगांव सरपंच समिर पाटील, दासभाऊ पाटील, माजी सभापती शालिक गायकवाड, माजी सभापती पांडुरंग पाटील, कुणाल पाटील, अमोल भावसार, चेतन पाटील, बापु मराठे, राजु पाटील, सुजित पाटील, सुशिल पाटील, राजेंद्र ठाकुर, निंबा चौधरी, दिनेश पाटील, राज पाटील, छोटु चौधरी, माजी नगरसेवक राजेंद्र कासार, मयुर मराठे, बापु पाटील, भिकन महाजन, भरत पाटील, भैय्या पाटील, चिंतामण पाटील, नंदु पाटील, सयाजी पाटील, सुनिल निकम, अस्लम खाटीक, सिध्दार्थ जावळे, महेंद्र पाटील, सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिवसैनिक आदी उपस्थित होते.

यावेळी उपरोक्त मागण्या त्वरीत मार्गी लावण्यात येईल असे लेखी निवेदन यावेळी नही प्रा.लि.चे अधिकारी अरूण सोनवणे, पंकज प्रसाद, दिग्वीजय पाटील, प्रदीप त्रीवेदी, अनुपकुमार श्रीवास्तव, नंदकुमार जोशी, शशी जोशी यांनी सह्यानिशी दिले.

हेही वाचा: राज्यात ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना अ‌ॅलर्ट जारी

यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी महामार्गाच्या कामकाजाच्या उदासिनतेबद्दल नाराजी व्यक्त करित या कामाशी निगडीत असलेल़्या सर्व विभागांची मिलिभगत असुन महामार्गावरिल खड्ड्यामुळे लोकांचा जीव जात असुन अधिकारी मात्र सुस्त होवुन काम कासव गतीने करित आहे.काम करण्याची मुदत संबंधित विभागाला मिळाली असुन तात्काळ कामाला गतीमानता न मिळाल्यास जनतेसाठी मी पुन्हा रस्त्यावर येवुन जनआंदोलन करण्याचा इशारा यावेळी आमदार पाटील यांनी दिला. दरम्यान बायपास वर केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे तब्बल दीड ते दोन किमी वाहनांचा रांगा उभ्या होत्या. आंदोलन नंतर पोलिसांनी महामार्ग सुरळीत केला.

loading image
go to top