धानोऱ्यातील सतपंथ मंदिरात 37 वर्षांपासून तेवतेय अखंड ज्योत!

Dhanora: The flame that has been burning continuously for 37 years in the Satpanth temple.
Dhanora: The flame that has been burning continuously for 37 years in the Satpanth temple.esakal

धानोरा (जि.जळगाव) : येथे तीनशे वर्षांपासून सतपंथ ज्योत मंदिराची स्थापना करण्यात आली असून, ३७ वर्षांपासून गायीच्या शुद्ध तुपाची अखंड ज्योत तेवत आहे. सोमवारी (ता. २६) या अखंड ज्योतीचा ३७ वा वर्धापन दिन असून, यानिमित्ताने मंदिरात सकाळपासूनच पूजापाठ व नवस फेडण्यासाठी भाविक भक्तांची मोठी गर्दी होत असते.

येथील सतपंथ मंदिरात दर वर्षी घटस्थापनेच्या दिवशी अखंड ज्योतीचा वर्धापन दिन भक्तिभावाने साजरा केला जातो. यानिमित्त मंदिर आकर्षक रोषणाई व फुलांनी सजविण्यात येते. सकाळी सहाला अथर्ववेदाप्रमाणे सतपंथ घटपाट पूजाविधी करण्यात येतो. पूजेनंतर मंदिरावर सफेद रंगाचा ध्वज चढविला जातो. (The flame that has been burning continuously for 37 years in the Satpanth temple jalgaon news)

Dhanora: The flame that has been burning continuously for 37 years in the Satpanth temple.
जागर स्त्रीशक्तीचा : महिला स्वयंपूर्णतेच्या ऊर्जेचे प्रतीक बनली पिंक रिक्षा

सदतीस वर्षांपासून अखंड ज्योत

धानोरा येथील सतपंथ मंदिर तीनशे वर्षांपासून स्थापन करण्यात आले असून, ३७ वर्षांपासून येथे गायीच्या शुद्ध तुपाची अखंड ज्योत रात्रंदिवस सुरूच असते. यासाठी दररोज या दिव्यात अर्धा किलो तूप लागते.

गुढीपाडव्याला मोठा उत्सव

चैत्र महिन्यात गुढीपडव्याला मंदिराचा ध्वज चढविला जातो. यादिवशी भाविक भक्त नवस फेडण्यासाठी येतात. यानिमित्ताने मंदिरातर्फे धर्मपीठ प्रेरणा पीठ पिराणा (अहमदाबाद, गुजरात) येथे पदयात्रा काढली जाते. यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहाशे किलोमीटरचे अंतर १५ दिवसांत पार करतात.

वर्षभर धार्मिक कार्यक्रम

सतपंथ ज्योत मंदिरात वर्षभर विविध प्रकारचे धार्मिक विधी पार पाडले जातात. यात प्रामुख्याने दैनंदिन पूजापाठ, गुरुवारी महापूजा, मृत्यूनंतर मोक्षप्राप्तीसाठी उटासन, देवीचे पाठ, होमहवन, दररोज सायंकाळी महाआरती केली जाते.

संतांचे मार्गदर्शन

हिंदू धर्मात सतपंथ हा एक पंथ असून, यात कलियुगातील अथर्ववेदावर आधारित पूजाविधी केली जाते. यासाठी सतपंथाचे जगद्‌गुरू श्री ज्ञानेश्वरदास महाराज (गुजरात) व महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज (फैजपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे धार्मिक सोहळे पार पडतात.

Dhanora: The flame that has been burning continuously for 37 years in the Satpanth temple.
नवरात्रीसाठी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी मिळणार? फडणवीसांचे संकेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com