Jalgaon News: हतनूरमधील गाळामुळे दरवर्षीच पूरस्थिती! गाळ काढणे अशक्य

Hatnur dam
Hatnur dam esakal

Jalgaon News : दरवर्षी तापीला आलेला पूर, पुरामुळे भरणारे हतनूर धरण आणि धरणाच्या बॅकवॉटरमुळे रावेर, मुक्ताईनगर तालुक्यांतील गावांमध्ये पुराची समस्या नित्याचेच झालेय.

मात्र, ३ टीएमसी क्षमता असलेल्या या धरणामध्ये निम्म्यापेक्षा अधिक गाळ असल्याने त्याची साठवण क्षमता कमी झालेली असून, त्यामुळेच बॅकवॉटरमध्ये गावेच्या गावे प्रभावित होत असतात. (Flooding every year due to silt in Hatnoor Impossible to remove sludge Jalgaon News)

निम्म्याहून अधिक जमा झालेला गाळ काढणे आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या परवडणारे नाही. म्हणून धरणावरील अतिरिक्त ८ दरवाजांचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. हे दरवाजे पूर्ण झाल्यानंतर त्यातून पुराचे पाणी सोडणे सोयीचे होऊन धरणातील गाळही वाहून जाईल.

त्यामुळे बॅकवॉटरमुळे निर्माण होण्यावर स्थितीवर नियंत्रण मिळवता येणे शक्य होणार आहे. तापी या मुख्य वाहिनी नदीचा उगम मध्यप्रदेशातील बैतुलमधून होतो.

हे स्थळ व एकूणच हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असतो. तिकडे विदर्भातील पूर्णा नदीही तापीला चांगदेव या संगमस्थळी मिळते. त्यामुळे दोघांना पूर आला की हतनूर लगेच भरते.

३ टीएमसी क्षमता, निम्मे गाळ

हतनूरची क्षमता ३ टीएमसी एवढी आहे. मात्र, या धरणाच्या एकूण साठवण क्षमतेत सध्याच्या स्थितीत जवळपास ५० टक्के गाळ साचला आहे. वर्षानुवर्षे हा गाळ काढण्याचे कामच झाले नाही. गाळ साठून काही ठिकाणी खडकच बनला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Hatnur dam
Viral Disease: स्‍वच्‍छता, सावधगिरीतून राहा निरोगी! शहरात साथीच्‍या आजारांमुळे आरोग्‍यविषयक तक्रारींत वाढ

गाळ काढणे न परवडणारे

आता गाळ काढण्याचे काम परवडणारे नाही. धरणातील संपूर्ण गाळ काढण्याला दुसरा प्रकल्प उभा करण्याएवढा खर्च लागणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

मात्र, त्यासाठी पर्याय म्हणून व हतनूरमधील जलसाठा, त्यातून निर्माण होणारी पूरस्थिती नियंत्रणासाठी धरणाला अतिरिक्त ८ दरवाजे बसविण्यात आले आहेत.

या दरवाजांचे काम जवळपास ७० ते ८० टक्के पूर्ण झालेय. मात्र, धरणाजवळील कार्यालय, विश्रामगृह, वसाहत व काही भागाच्या स्थलांतराचा प्रश्‍न कायम आहे. त्यामुळे दरवाजांचे काम रखडले आहे.

दरवाजे डाऊन स्ट्रीमला

हे दरवाजे डाऊन स्ट्रीमला असल्याने त्यातून धरणातील पुराचे पाणी सुलभतेने सोडता येईल. नव्याने जमा होणारा गाळही बऱ्यापैकी वाहून जाण्यासाठी मदत होईल.

त्यामुळे या कामातील काही तांत्रिक त्रुटी दूर कुरुन, प्रलंबित कामांना निधी आणून दरवाजांचे काम पूर्ण करता येईल. त्यातून बॅकवॉटरमुळे निर्माण होणारी पूरस्थिती दूर करण्यात मोठी मदत होईल.

लोकप्रतिनिधींनी विशेषत: रावेर, मुक्ताईनगरातील आमदार, खासदारांनी त्यासाठी पाठुपरावा करणे गरजेचे आहे.

Hatnur dam
Nashik News: नदीजोड प्रकल्पाची राज्य मंत्रिमंडळात घोषणा! निधीसाठी प्रस्ताव लवकरच केंद्राकडे पाठविणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com