Jalyukta Shivar Abhiyan : जलयुक्त शिवार अभियानात जळगाव जिल्ह्यातील 244 गावे

Jalyukta Shivar Yojana
Jalyukta Shivar Yojanaesakal

Jalgaon News : राज्य शासनाने राज्यात जलयुक्त शिवार अभियान २.० राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्याकरीता २४४ गावांची जलयुक्त अभियान २.० करीता निवड करण्यात आली आहे. (For district 244 villages were selected for Jalyukta Abhiyan 2 0 Jalgaon news)

या गावांमध्ये जलयुक्तची कामे तातडीने सूरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता. १७) व्ही. सी. द्वारे जिल्हाधिकारी अमन मित्तल व अभियानाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शेतशिवार हे अभियान राबवावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

तालुकानिहाय निवड झालेली गावे अशी :

अमळनेर- हिंगोणे बुद्रूक, खोकर पट, लाडगाव, बोदार्ड, अमळनेर (ग्रामीण), कामतवाडी बुद्रूक, देवगाव, ढेकु खुर्द, धुपी, एकरुखी, कुऱ्हे खुर्द, कुऱ्हेसीम, मांजर्डी, पिळोदे, व्याव्हरदल (एकूण १५)

बोदवड- येवती (१)

भडगाव- मांडकी (१)

चोपडा- असलवाडी, बढाई, बदावानी, चांदसनी, देवगाव, इच्छापुर, कमलगाव, मितावली, पंचक, पारगाव, पिंपरी, पुनगाव, अजंती खुर्द, भोकारी, दोंदवाडे, गर्ताड (एन. व्ही.), घडवेल, घुमावल बुर्दूक, गोरगावले खुर्द, कर्जाणे, खाडगाव, खेडी बुद्रूक, कुरवेल, माजरेहोळ (एन. व्ही.), मंगरुळ, रुखाणखेड प्र. चोपडा, बटार, वडगाव बुद्रुक, वेले, सनपुले, सुतकर, तावसे बुद्रूक (३२).

चाळीसगाव- मंडुरणे, बेलदार वाडी, भवली, भोर, एकलहरे, गणपुर, गुजारदरी, हिंगोणे सीम, जावले, जुनापणी सेट, जुनोने, काकडने, नाईकनगर, नांद्रे, निमखेडी, राजदेहरे सेत, सायगाव, शिडवाडी, तांबोळे खुर्द, विष्णुनगर (२०).

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalyukta Shivar Yojana
Jalgaon News : पक्षीमित्राने वाचवले शृंगी घुबडाचे प्राण

धरणगाव- अहिरे खुर्द, बाभुळगाव, चावलखेडे, कल्याणे बुद्रूक, कल्याणे खुर्द, कल्याणे होळ, नणे, पिंपळे सीम, सातखेडे, विवरे, वाघळुद बुद्रूक (११)

एरंडोल- हनमंत खेडे माजरे, जावखेडे खुर्द, सोनबर्डी, पाटरखेडे, पळासदळ, धारागिर, नांदगाव बुद्रूक (७).

जळगाव- आमोदे खुर्द, भादली खुर्द, भोकर, देऊळवाडी, धानोरे खुर्द, करंज, कठोरे, खापरखेडे, किनोद, नांद्रे खुर्द, रीधुर, सावखेडा खुर्द, सुजदे, तारखेडा, आव्हाणे, फूफनगरी, खिर्डी खूर्द, वरखेडे (१८)

जामनेर- गणेशनगर, लाखोली, नवापूर, पळासखेडे मिराचे, तरंगवाडी (५)

पारोळा- खोलसर, कोळपिंप्री, मोरफळ, उदानीखालसा, खापरे, आंबापिंप्री, बहुटे, दहीगाव, धाबे, पुलपत्री, मुंडाने प्र., अमळनेर, पातरखेडे, रामनगर, शेवगे प्र., बहाळ, सुमठाणे, उत्तराड, वडगाव प्र., एरंडोल, इटनेर (१८).

पाचोरा- बहुलेश्‍वर, भोजे, भोरटेक खुर्द, बिल्दी बुद्रूक, चिंचखेडे, हुले गाळण बुद्रूक, घुसर्डी बुद्रूक, होळ, जवखेडा दिगर, लोहारी खुर्द, मोहळाई, नगरदेवळा सीम, नेरी, निभोरी खुर्द, राजोरी खुर्द, साजगाव, संगमेश्‍वर, सार्वे बुद्रूक, प्र. भडगाव, वडगावकडे, वरखेडी बुद्रूक, वरखेडी खुर्द (२२)

Jalyukta Shivar Yojana
Jalgaon E Machine : जळगावचे रस्ते साफ करणार इलेक्ट्रीक झाडू; महापालिका खरेदी करणार मशीन

रावेर- बोऱ्हाडे, बोरखेडे, बोरखेडे सीम, चिनावल, चुनवाडे, दसनूर, धुराखंडे, दोधे, गवंडी, गाते, गोलखेडे, गोलवाडे, कर्जाद, केऱ्हाळे बुद्रूक, खानापूर, खिर्डी बुद्रूक, खिर्डी खुर्द, खिरोदे प्र., रावेर, खिरोदे प्र., यावल, खिरवड, कोचुर बुद्रूक, कोचुर खुर्द, कोळोदे, कुंभारखेडे, कुसुंबे खुर्द, लोहारे, लुमखेडे, मंगलवाडी, मांगी, मस्कावद बुद्रूक, मस्कावद सिम, मोहामांडली (जुना), मोरगाव बुद्रूक, मुंजलवाडी, नेहेते, निंभोरे सिम, पातोंडी, पुनखेडे, पुरी, रासलपुर, रावेर ग्रामीण, रैभोटे, रोझोदे, सांगवे, सावखेडे बुद्रूक, सावखेडे खुर्द, शिंगाडी, सिंगानुर, सिगट, सुलवाडी, सुनोदे, तामसवाडी, तांदळवाडी, थेरोडे, उधाळी बुद्रूक, विटवे, विवरे खुर्द, वडगाव, वाघोद, वाघोदे बुद्रूक (६०).

यावल- वाघोदे प्र., सावदा, डांभुर्णी, डोणगाव, फेझपुर (ग्रामीण), गिरडगाव, इचखेडा, करंजी, कासवे, खालकोट, किनगाव बुद्रूक, किनगाव खुर्द, मानपूर, न्हावी प्र., अडावद, पिळोदे बुद्रूक, पिप्रुड रिधोरी, तोलाणे, उंटावद, विरोदे, वाघोदे, बोरावल बुद्रूक, चिखली खुर्द, चिखोली बुद्रूक, चितोडे, म्हैसवाडी, निमगाव, पिंप्री, रोजोरे, रुइखेडे, सांगवी खुर्द, टाकरखेडे, टेंभी खुर्द, वाघळुद, यावल ग्रामीण (३४)

शिवार फेरी अन्‌ आराखडा

सदस्य सचिव जलयुक्त शिवार अभियान २.० तथा उपविभागीय जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण उपविभाग पारोळा, जळगाव, भुसावळ, चोपडा यांना या अभियानाअंतर्गत मान्यताप्राप्त गावांमध्ये शिवार फेरी करणे व गाव आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार १८० गावामध्ये शिवार फेरी पुर्ण झाली आहे. गाव आराखडा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. अभिसरणाच्या माध्यमातून एकूण ६९ हजार ८९२ कामे मंजूर आहेत. तसेच, त्याकरीता ६५०५.७३ लक्ष इतका निधी उपलब्ध होणार आहे.

Jalyukta Shivar Yojana
Heat Stroke : उष्माघाताचे रुग्ण वाढले; वेळीच उपचार घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com