Jalgaon News : पक्षीमित्राने वाचवले शृंगी घुबडाचे प्राण

person Saved life of shrungi owl jalgaon news
person Saved life of shrungi owl jalgaon newsesakal

Jalgaon News : आजारी व अशक्त असल्याने आकाशात उडू न शकणाऱ्या शृंगी घुबडाला घरी आणून त्याच्यावर योग्य उपचार केल्यानंतर पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडणाऱ्या येथील पक्षी मित्रांच कौतुक होत आहे. (person Saved life of shrungi owl jalgaon news)

याबाबत माहिती अशी, गुरुवारी (ता. ११) रात्री साडेदहाच्या सुमारास रस्त्याच्या कडेला घुबड बसलेले असून त्याला उडता येत नसल्याचा निरोप येथील पक्षी व वन्यजीव संवर्धक हेमराज पाटील यांना दिनेश बोरसे यांच्याकडून आला. क्षणाचाही विलंब न करता, श्री. पाटील हे त्या ठिकाणा गेले व त्यांनी घुबडाला घरी आणले.

त्याची प्राथमिक तपासणी केली असता, घुबडाला कुठेही जखम नव्हती. मात्र, ते आजारी व अशक्त असल्याने तसेच अनेक दिवसांपासून त्याला शिकार मिळालेली नसल्याने आणि त्यात उन्हाचा तडाखा यामुळे ते त्रस्त होते. हेमराज पाटील यांनी घुबडाला योग्य औषधोपचार करुन आवश्यक मांसाहार दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी घुबडाच्या तब्येतीत सकारात्मक बदल जाणवला. घुबडाच्या स्वच्छतेची त्यांनी विशेष काळजी घेतली.

ट्रीटमेंट पिंजऱ्यात मातीचे मोठे जलपात्र भरून ठेवले. ज्यात घुबड दिवसातून चार ते पाच तास पाण्यात थांबून शरीरातील उष्णतापमान कमी करण्याचा प्रयत्न करायचे. दोन दिवसात घुबड चपळाईने हालचाल व पंखांची फडफड करू लागले. घुबडाच्या मुक्त हालचालींसाठी त्याला मोठ्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले. अधूनमधून ते मोठा आवाज देखील करायचे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

person Saved life of shrungi owl jalgaon news
Jalgaon News : विधवा वहिनीला दिराने दिला आधार! समाजात एक नवा आदर्श...

तीन दिवसांतच ते त्याच्या नैसर्गिक अधिवासात उडण्यासाठी सज्ज झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार, घुबडाला रविवारी (ता. १३) उशिरा रात्री सुखरूप सोडण्यात आले. त्याच्या सुश्रुषा व उपचारकामी अश्विनी पाटील व आर्यदीप पाटील यांची मदत झाली. शिवाय नितीन शिंपी यांचेही सहकार्य लाभले.

शृंगी घुबडांची संख्या आपल्या भागात बऱ्यापैकी आढळून येते. निसर्गातील अन्नसाखळीतील घुबड हा महत्त्वाचा घटक असून शेतकरी व मानवाचा मित्र आहे. एक घुबड वर्षाला साधारणतः साडेतीनशे ते चारशे उंदीर मारते.

शेतातील पीक व अन्नधान्याचे नुकसान करणाऱ्या उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवते. त्याचबरोबर इतर लहान सजीवांचे देखील भक्षण करून निसर्ग साखळीतील संतुलन टिकविण्यास मदत करते. म्हणून त्यांचे संवर्धन करणे अनिवार्य असल्याचे सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेचे हेमराज पाटील यांनी सांगितले.

person Saved life of shrungi owl jalgaon news
Amalner Bazar Samiti : बाजार समितीवर सभापतिपदी महाविकास आघाडीची सत्ता, विरोधक गैरहजर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com