देवझिरीतील वनक्षेत्रावरील अतिक्रमण हटवले; 4 झोपड्या जमिनदोस्त

सुमारे २७ हेक्टर वनजमिनीवरील हे अतिक्रमण काढण्यासाठी आठ दिवसांपासून राज्य राखीव पोलिस दलासह मोठा फौजफाटा तैनात होता.
देवझिरीतील वनक्षेत्रावरील अतिक्रमण हटवले; 4 झोपड्या जमिनदोस्त
SYSTEM

यावल (जि. जळगाव) : येथील वनविभागांतर्गत येणाऱ्या सातपुड्यातील देवझिरी वनखंड क्रमांक १६५ जमिनीवर मध्यप्रदेशासह काही स्थानिक नागरिकांनी केलेले अतिक्रमण हटवण्याची कारवाई वन विभागाने केली. सुमारे २७ हेक्टर वनजमिनीवरील हे अतिक्रमण काढण्यासाठी आठ दिवसांपासून राज्य राखीव पोलिस दलासह मोठा फौजफाटा तैनात होता. वन विभागच्या या जागेवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी ‘जेसीबी’ने चर खोदण्यात आले असून लवकरच या ठिकाणी बियांची लागवड केली जाणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

देवझिरी (ता. चोपडा) येथील राखीव वनखंडाच्या सुमारे २७ हेक्टर पेरणीयोग्य जमिनीवर गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेशातून घुसखोरी करुन आलेल्या काही जणांनी आपल्या झोपड्या उभारल्या होत्या. यासोबत काही स्थानिक रहिवाशांनी देखील अतिक्रमण केलेले होते. वन विभागाच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी अतिक्रमण करणाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी अतिक्रमण काढले नव्हते. त्यामुळे नवन्यजीव व प्रादेशिक विभागाने आठ दिवसांपासून अतिक्रमण काढण्याची मोहिम हाती घेतली होती. या कारवाईत निर्बंध असलेल्या वनक्षेत्रात उभारलेल्या अतिक्रमित चार झोपड्या पथकाने जमिनदोस्त केल्या.

देवझिरीतील वनक्षेत्रावरील अतिक्रमण हटवले; 4 झोपड्या जमिनदोस्त
शेतकऱ्याकडून लाच स्वीकारताना वायरमनसह खासगी पंटरला अटक

मोठा फौजफाटा तैनात

वनक्षेत्रात मोबाईलचे नेटवर्क मिळत नसल्याने व संपर्काच्या दुसऱ्या कुठल्याही सुविधा नसल्याने अटीतटीच्या प्रसंगी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांची दंडाधिकारी म्हणून म्हणून नियुक्ती केली होती. अडावद (ता. चोपडा) येथील पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी, ‘जेसीबी’सह मोठा फौजफाटा तैनात होता. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वनक्षेत्रात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली जाते. ही कारवाई अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, पी. कल्याणकुमार, धुळे प्रादेशिक वनसंरक्षक दिगंबर पगार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. चोपडा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषीकेश रावळे, अमळनेरच्या उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, चोपड्याचे तहसीलदार अनिल गावीत, अडावदचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांच्या सहकार्याने उपवनसंरक्षक एच. एस. पद्मनाभ, चोपड्याचे सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे तसेच देवझिरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोपाल बडगुजर, वैजापूरचे समाधान सोनवणे, यावलचे विक्रम पदमोर, रावेरचे अजय बावणे, संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन वनपरिक्षेत्र अधिकारी आनंदा पाटील, मंडळाधिकारी एस. वाय. सपकाळे, अडावदचे सहाय्यक फौजदार जगदीश कोळंबे यांच्यासह पोलिस, एसआरपी वन तुकडी, गस्ती पथक, वनपाल, वनरक्षक, वनमजूर अशा ९४ जणांनी पाच ‘जेसीबी’च्या सहाय्याने अतिक्रमण निर्मुलन मोहीम फत्ते केली. या धडक कारवाईमुळे वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. वनक्षेत्रात अजूनही बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.

देवझिरीतील वनक्षेत्रावरील अतिक्रमण हटवले; 4 झोपड्या जमिनदोस्त
वीजचोरी करणाऱ्यांना 5 लाखांचा दंड; महावितरणची 18 ग्राहकांवर कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com