जळगाव : चौपदरीकरणात सांधेजोड अपूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road

जळगाव : चौपदरीकरणात सांधेजोड अपूर्ण

पारोळा - महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम आता प्रगतिपथावर आहे. मात्र, रस्त्याच्या कामाचा एक टप्पा पूर्ण होऊन त्याला लागून दुसरा टप्पा सुरू होतो, त्याची सांधेजोड केलेली नाही. त्यामुळे सांधेजोड न झालेल्या ठिकाणी वाहने उधळतात. परिणामी, वाहनचालकांसह प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जळगाव-पारोळ्यादरम्यान महामार्गावरील सांधेजोड त्वरित करावी, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

अनेक वर्षांपासून महामार्गाचे काम कासवगतीने सुरू होते. मात्र, बऱ्याच वेळा महामार्गाच्या कामाबाबत अनेकांनी आवाज उठून कामाला गती यावी, यासाठी प्रयत्न केले. आता महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बऱ्यापैकी सुरू झाले आहे. मात्र, पहिला टप्पा व दुसरा टप्पा याला जोडणारे सांधेजोड न झाल्याने वाहनधारक व प्रवाशांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनचालकांना खड्डे चुकवून वाहन मार्गक्रमण करून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. तथापि, ही रस्त्यावरील सांधेजोडची ठिकाणे लक्षातच येत नाही. जळगाव ते पारोळ्यादरम्यान तब्बल २८ ठिकाणी सांधेजोड करण्याची गरज असल्याची कैफियत प्रवाशांनी ‘सकाळ’कडे मांडली. जळगाव ते पारोळा, तसेच एरंडोल ते पारोळा अशा दोन ठिकाणी पारोळा येथे बरेच नोकरदार नोकरीनिमित्त ये- जा करतात. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी विविध कामांसाठी प्रवास करतात. मात्र, त्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाला अनेकवेळा तोंडी सांगूनही महामार्गावरील महत्त्वाच्या सांधेजोड विषयाला दुर्लक्षित केले जात आहे. याबाबत महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या महत्त्वाच्या विषयाला चालना देऊन महामार्गावरील सांधेजोड तत्काळ करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

महामार्गावर कोंडीची समस्या

एकीकडे महामार्ग चौपदरीकरणात सांधेजोडची प्रश्‍न प्रलंबित असताना, पारोळा, एरंडोल, जळगाव शहरालगत रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी अधिकच वाढली आहे. पारोळा, एरंडोल शहराजवळ व्यावसायिकांच्या टपऱ्या, फेरीवाल्यांमुळे अनेकदा लहान-मोठे अपघातही होतात.

Web Title: Four Lane Highway Bitween Jalgaon Parila

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top