Surya Namaskar : आर्याचा चौथ्‍या वर्षीच १०८ सूर्यनमस्कारांचा विक्रम; इंडिया बुक, एशिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद

परदेशात राहूनही भारतीय संस्कार, योग व कुटुंबाच्या परंपरेशी नाते जपणाऱ्या नाशिक व जळगावशी नाळ जुळलेल्‍या आर्या शाह हिने वयाच्या चौथ्‍या वर्षी १०८ सूर्यनमस्कार पूर्ण करण्याची केली कामगिरी.
Arya Shah

Arya Shah

sakal

Updated on

जळगाव - परदेशात राहूनही भारतीय संस्कार, योग व कुटुंबाच्या परंपरेशी नाते जपणाऱ्या नाशिक व जळगावशी नाळ जुळलेल्‍या आर्या शाह हिने वयाच्या चौथ्‍या वर्षी १०८ सूर्यनमस्कार पूर्ण करण्याची कामगिरी केली. तिच्या या कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे.

सुशील शाह व भैरवी शाह यांची कन्या आर्या कुटुंबासह कॅनडात वास्तव्यास आहे. परदेशातील वातावरणात वाढत असतानाही योग, शिस्त व भारतीय संस्कारांची नाळ तिने घट्ट धरून ठेवली आहे. तिच्या कामगिरीमागे केवळ योगाचा सराव नसून, कुटुंबातील योगाची परंपरा व लहानपणापासून मिळालेले संस्कारही महत्त्वाचे ठरले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com