cyber crime relaed with Online Diwali Offer
cyber crime relaed with Online Diwali Offeresakal

Jalgaon Cyber Crime : Online Diwali Offersने काढले दिवाळं तरुणीला २९ हजारांना गंडविले

Published on

जळगाव : रिंग रोड यशवंत कॉलनीतील तरुणीची दिवाळी ऑफर्समध्ये आवश्यक साहित्याची ऑर्डर देण्याच्या नावाखाली तब्बल २९ हजारांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला असून, जिल्हापेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

दिशा अनिल अग्रवाल (वय २९) रिंग रोड यशवंत कॉलनीत वास्तव्याला आहेत. त्या ऑनलाइन पद्धतीने व्यवसाय करून कुटुंबाला हातभार लावतात. दिशाने ऑनलाइन पद्धतीने दिवाळी सणासाठी लागणाऱ्या वस्तू ऑर्डरनुसार मागविल्या होत्या.(Fraud of Girl for 29 thousand under Online Diwali Offers Jalgaon cyber crime News)

cyber crime relaed with Online Diwali Offer
Jalgaon Cyber Crime : Instagramवरुन धार्मीक भावना दुखावल्या

ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करूनही कोणत्याही वस्तू आल्या नाहीत. यासाठी साक्षी सिंग आणि पीयूष जैन (रा. उदयपूर, राजस्थान) यांनी तरुणीचा विश्वास संपादन करून फोन-पे मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून २९ हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे.

तरुणीने शनिवारी (ता. १) जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार असून, दुपारी दोनला साक्षी सिंग आणि पीयूष जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार पुरुषोत्तम वागळे तपास करीत आहेत.

cyber crime relaed with Online Diwali Offer
Sharad Pawar on Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पवारांनी खडसावलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com