जळगाव : किरणा दुकानदारास दीड लाखांचा चुना

कासोदा येथील एका किराणा दुकानदाराला १ लाख ३७ हजार ५०० रुपयांत गंडवल्याची घटना घडली.
online fraud
online fraudesakal
Updated on

जळगाव : ‘मी अमुक ऑनलाइन शॉपिंग ॲपचा कस्टमर केअर ऑफिसर बोलतोय’ असे सांगत सायबर गुन्हेगारांनी कासोदा येथील एका किराणा दुकानदाराला १ लाख ३७ हजार ५०० रुपयांत गंडवल्याची घटना घडली. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कासोदा (ता. एरंडोल) येथील किराणा दुकानदार सैय्यद अरशद अली अख्तर अली (वय ३०) यांनी मीशो या ऑनलाईन खरेदी ॲपच्या माध्यमातून काही वस्तू मागविल्या होत्या. ऑर्डर बुक केल्यानंतर बुधवारी (ता. ११) दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान सैय्यद अली यांना अनोळखी मोबाईलवरुन फोन आला. समोरच्या व्यक्तीने आपण मीशो ऑनलाईन खरेदी ॲपच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून सैय्यद अली यांना एनीडेक्स या नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. ॲपडाऊनलोड करताच संबंधिताने सैय्यद अली यांच्या बँकेच्या खात्यातून ऑनलाईन पध्दतीने परस्पर १ लाख ३७ हजार ५०० रुपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर सैय्यद अली यांनी जळगाव सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.

online fraud
लाच मागणाऱ्या हवालदाराला अटक; 23 दिवसांनंतर गुन्हा दाखल
online fraud
Jalgaon : दीड लाखाच्या गांजाची वाहतूक करणाऱ्याला पकडले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com