Jalgaon : दीड लाखाच्या गांजाची वाहतूक करणाऱ्याला पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganja Smuggler Arrested

Jalgaon : दीड लाखाच्या गांजाची वाहतूक करणाऱ्याला पकडले

अमळनेर (जि. जळगाव) : शहरात गांजाची (Cannabis) वाहतूक करताना ताडेपुरा भीमनगर येथील तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्याच्याजवळून दीड लाखाचा १० किलो गांजा पकडल्याची घटना काल (ता. १६) सायंकाळी पाचच्या सुमारास मंगरूळ येथील माध्यमिक शाळेजवळ घडली. (One and half lakh worth ganja smuggler caught Jalgaon Crime news)

येथील पोलिस निरीक्षक जयपाल हिरे हे आपले सहकारी किशोर पाटील, मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंखे, अमोल पाटील, नीलेश मोरे, कैलास पाटील यांच्यासोबत पालखी बंदोबस्तासाठी यात्रेत असताना मंगरूळ शिरूड फाट्याजवळ एक तरुण विक्रीसाठी गांजा आणत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार श्री. हिरे हे सहकाऱ्यांसह संबंधित ठिकाणी गेले असता, संशयिताला पोलिस येत असल्याची चाहूल लागल्याने तो तेथून पळू लागला. पोलिसांनी पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले.

हेही वाचा: वाहतूक बेट सुशोभीकरणाला प्रतिसाद; 4 लाख रॉयल्टीसह 8 विकासक आले पुढे

संशयित तरुण ताडेपुरा भीमनगर येथील रहिवासी असून त्याचे नाव संतोष अशोक ढिवरे (वय ३५) असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याजवळ १ लाख ५० हजार रुपये किमतीचा १० किलो ३८६ ग्रॅम गांजाची दोन पाकीटे मिळून आली. त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, संशयित संतोष ढिवरेला येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश एम. के. पाटील यांनी २० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

हेही वाचा: वऱ्हाडाची क्रुझर, एसटी, स्कुल बसला पसंती; ट्रॅक्टर, ट्रकवर कोणी बसेना

Web Title: One And Half Lakh Worth Ganja Smuggler Caught Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaoncrimeamalner news
go to top