Latest Marathi News | पदवीधर मतदारसंघाच्या नव्याने मतदारयाद्या; या तारखेपासून प्रक्रिया सुरू होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fresh Voter Lists of Graduate Constituency

पदवीधर मतदारसंघाच्या नव्याने मतदारयाद्या; या तारखेपासून प्रक्रिया सुरू होणार

जळगाव : नाशिक पदवीधर मतदारसंघाचा कार्यकाळ २३ फेब्रुवारी २०२३ ला पूर्ण होत आहे. त्याअनुषंगाने या मतदारसंघाची नव्याने मतदार यादी तयार करण्यात येत आहे. १ ऑक्टोबरपासून मतदारसंघाच्या मतदारयाद्यांची पुनरीक्षण प्रकिया सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. निवडणूक उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे या वेळी उपस्थित होते. (Latest Marathi News)

हेही वाचा: गणेशोत्सव, कोरोना काळातील केसेस मागे घेण्यात येणार; CM शिंदेंची घोषणा

या मतदारयाद्या पुनरीक्षणाचा कार्यक्रम १ ऑक्टोबरला जाहीर होईल. त्यानंतर संबंधित मतदारांनी नमुना क्रमांक १८ भरून मतदार नोंदणी करावयाची आहे. १ नोव्हेंबर २०२२ (अर्हता तारीख) किमान तीन वर्षे भारतातील विद्यापीठाची एकतर पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समकक्ष असलेली अर्हता धारण करीत असेल अशा व्यक्तीने मतदार नोंदणी करावयाची आहे. सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे हा अर्ज भरून द्यावयाचा आहे. मतदार प्रारूप मतदारयादी २३ नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल. दावे हरकती २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबरदरम्यान घेता येतील. अंतिम मतदारयादी ३० डिसेंबरला जाहीर होईल.

हेही वाचा: उद्धव ठाकरेंवर संजय राऊत यांचा ट्रॅप : चंद्रशेखर बावनकुळे

Web Title: Fresh Voter Lists Of Graduate Constituency

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaonelectionvoter list
go to top