Municipality Funding : मनपात विकासकामांच्या निधीत असमतोल; प्रशासकीय प्रस्तावांना राजकीय द्वेषातून बगल

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal

Jalgaon News : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत शासनाकडून महापालिकेला निधी मिळतो. महासभा, महापौर, आयुक्तांच्या मान्यतेने प्रभागनिहाय प्रशासकीय प्रस्ताव सादर केले जातात. मात्र, त्यांना राजकीय द्वेषातून बगल देऊन केवळ दोन ते चार प्रभागांतच निधी वळता केला जात आहे. (Funds are being delivered only in two to four wards by avoiding political animosity jalgaon news)

त्यामुळे शहरात विकासाचा असमतोल असून, नागरिकांत प्रचंड नाराजी आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत लक्ष द्यावे, असे पत्र उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

पत्रात म्हटले आहे, की अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजना, सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना २०२२-२३ अंतर्गत महापालिकेने महासभा, महापौर व आयुक्तांच्या मान्यतेने प्रभागनिहाय विकासकामे होण्यासाठी प्रशासकीय मान्यतेने प्रस्ताव सादर केले होते. प्रस्तावांना राजकीय द्वेषापोटी हेतूपुरस्सर बगल देऊन प्रस्ताव बाजूला सारत केवळ दोन ते चार प्रभागांत पूर्ण निधी वळता करण्यात आला.

त्यामुळे शहरात विकासकामांचा असमतोल व सोयीसुविधांचा अभाव झाला आहे. यामुळे जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे काही प्रभागांत विकासाचा अनुषेश आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कामे करण्याची मागणी होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासन व महासभेने सादर केलेल्या प्रस्तावांना प्राधान्य देऊन विकासकामांचा समतोल साधावा. त्यामुळे नागरिकांचा महापालिकेबाबत रोष कमी कमी होईल.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Fraud Crime : सायबर पोलिसांकडून बंगाली टोळी अटकेत; पर्यटन आवडणाऱ्यांना करायचे टार्गेट

महासभेतही नगरसेवकांचा आरोप

महापालिकेच्या महासभेतही काही नगरसेवकांनी विकासकामांच्या निधीत असमतोल असल्याचा आरोप केला आहे. काही दोन ते चार नगरसेवकांच्या प्रभागांतच निधी दिला जातो. इतर प्रभागांत प्रस्ताव देऊनही निधी दिला जात नाही. त्यावेळीही आयुक्तांनी आपण निधीबाबत लक्ष देऊ, असे सांगितले होते.

उपमहापौरांच्या आरोपामुळे वास्तव

उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी थेट निधीबाबतच वास्तव उघड केले आहे. त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिल्यामुळे आता जिल्हाधिकारी त्याकडे लक्ष देऊन समतोल निधी वाटपाबाबत काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून आहे.

"महापालिकेच्या विकासकामांसाठी आता शासनाकडून मिळणारा निधी विकासकामे न झालेल्या त्या भागात वितरित करण्यात यावा. त्यामुळे विकासाचा समतोल साधला जाईल व जनतेतही असंतोष होणार नाही." -कुलभूषण पाटील, उपमहापौर

Jalgaon Municipal Corporation
Solar Energy Project : सौरऊर्जा प्रकल्पासाठी जिल्ह्यात 155 हेक्टर जागा; 56 गावांत उभारणार प्रकल्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com