Jalgaon News : मंजुरीची कोटींची उड्डाणे... प्रत्यक्षात निधीची प्रतीक्षा

शहरात शासनाने विविध स्वरुपातील योजनेंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला.
road construction (file photo)
road construction (file photo)esakal

Jalgaon News : शहरात शासनाने विविध स्वरुपातील योजनेंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला.. मंजूर निधीअंतर्गत करावयाच्या कामांसाठी निविदा मंजूर होऊन, कार्यारंभ आदेश देऊन कॉंक्रिटीकरणाची कामे सुरु वेगात झाली.

मात्र, झालेल्या कामापोटी एका रुपयाचेही पेमेंट अद्याप मिळालेले नाही. ते मिळविण्यासाठी मक्तेदारासह बांधकाम विभागाची दमछाक होत आहे. (Funds were sanctioned for road works concreting works started at full speed But payment of even single rupee not received yet jalgaon news)

गेल्या आठ- दहा वर्षांपासून रस्त्यांमधील खड्ड्यांमुळे जायबंदी झालेल्या जळगाव शहराला त्यातून बाहेर काढण्यासाठी अलीकडच्या चार- पाच वर्षांत कोट्यवधींचा निधी शासनाने मंजूर केला.

तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी जळगावला येऊन १०० कोटींचा निधी मंजूर केला, पैकी सुरवातीला २५ कोटींचा निधी दिला. नंतरच्या टप्प्यात उर्वरित निधी प्राप्त झाला. ५८ कोटींच्या निधीतून कामे झाली, परंतु ४२ कोटींच्या निधीतील कामे क्वचितच दिसून आली..

नंतरही दोनशे कोटींचा निधी

फडणवीस सरकार गेल्यानंतर उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळात आधीच्या १०० कोटींच्या निधीतील कामांना ‘ब्रेक’ लागला. कोरोनाचे कारण पुढे करत सरकारने या कामांना स्थगिती दिली. त्यामुळे रस्ते पुन्हा खड्ड्यात गेले. ठाकरे सरकार साधारण जून २०२२ पर्यंत कार्यरत होते. या सरकारच्या अखेरच्या काळात ही स्थगिती उठली, मात्र कामांनी वेग पकडला नाही. नंतर शिंदे सरकार सत्तेत आले व पुन्हा जवळपास दोनशे कोटींचा निधी दोन टप्प्यात मंजूर झाला.

कॉंक्रिटीकरणाची कामे

आधी १०० कोटींच्या निधीतून शहरातील विविध भागातील लहान- मोठ्या रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाची कामे करण्याचा विषय मार्गी लागला. १०० कोटी शासनाने मंजूर केले. नंतरच्या टप्प्यात पुन्हा प्रमुख रस्त्यांसाठी ८५ कोटी मंजूर करण्यात आला.

मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे यांनी या निधीसाठी पाठपुरावा केला. आता या १८५ कोटींच्या मंजूर निधीतून शहरात विविध ठिकाणी कॉंक्रीट रस्त्यांची कामे होत आहेत. ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे.

road construction (file photo)
Jalgaon News : फुले मार्केट की ‘अतिक्रमणाचे बेट’; अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी दुकानदारांवरच

उपरस्त्यांसह वस्त्यांमधील रस्ते

१०० कोटींच्या निधीतील टप्प्यात गल्लीबोळातील तसेच अन्य उपरस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. जुने जळगाव, मोहननगर, नेहरूनगर, मोहाडी रोड परिसर यासह अन्य नागरी वस्त्यांमधील लहान- मोठ्या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे. यात जवळपास ७५ रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.

८५ कोटींच्या निधीतून प्रमुख रस्ते

सध्या शहरात या नागरी वस्त्यांसह प्रमुख रस्त्यांचेही कॉंक्रिटीकरणाचे काम होताना दिसत आहे. त्यात प्रामुख्याने काव्यरत्नावली चौक ते टॉवर चौक व अजिंठा चौफुली ते टॉवर चौक हे दोन प्रमुख रस्ते सध्या सुरु आहेत.

काव्यरत्नावली चौक ते हॉटेल रॉयल पॅलेसचे काम दोन्ही बाजूंनी पूर्ण झाले असून ते आता आकाशवाणी चौकापर्यंत सुरु आहे. तर याच मार्गावर स्वातंत्र्य चौक ते चिमुकल्या राम मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम होत आहे. ही कामे ८५ कोटींच्या निधीतून होत आहेत.

कामे पूर्ण, पेमेंट नाही

एकीकडे शहरात सर्वत्र रस्त्यांची कामे होताना दिसत आहेत. मात्र, दुसरीकडे या झालेल्या कामापोटी मक्तेदारांचे पेमेंट निघत नसल्याची त्यांची तक्रार आहे. बांधकाम विभागही त्यासाठी पाठपुरावा करीत असला तरी विभागाकडेच अद्याप या कामांच्या बदल्यात पेमेंट प्राप्त झालेले नाही.

road construction (file photo)
Jalgaon Education News : विद्यार्थिनींना आता उच्च शिक्षणही पूर्णपणे मोफत : मंत्री चंद्रकांत पाटील

जी काही लहान- मोठ्या रस्त्यांची कामे होती, त्यातील ७५ कामे पूर्ण झाली असून त्यावर १५ ते २० कोटींचा खर्च झाला आहे, पैकी एकही रुपयाचे देयक अदा झालेले नाही, अशी मक्तेदारांची तक्रार आहे.

८५ कोटींतून होत असलेली कामेही वेगात सुरु आहे. मात्र, त्या बदल्यात देयके सादर होऊनही शासनाकडून निधी मिळालेला नाही. अशीच स्थिती राहिली तर आता सुरु असलेली कामे तर अर्ध्यात बंद पडतील, आणि मंजूर कामेही सुरु होऊ शकणार नाही.

मंत्र्यांच्या प्रयत्नांची गरज

निधी मंजुरीसाठी जसा मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला. शासनाकडून भरीव निधी मंजूर करून घेतला.

मात्र, निधी हाती आल्याशिवाय सर्व कामे वेगाने मार्गी लागणार नाही, ही वस्तुस्थिती असल्याने अडकलेला निधी तातडीने कसा प्राप्त होईल, यासाठी शासनाकडे या मंत्र्यांसह आमदार, लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे.

road construction (file photo)
Jalgaon HSC News : बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com