
देशी, विदेशी, गावठी हातभट्टीची विनापरवाना दारूची विक्री होत असल्याची चर्चा गावभर होत होती पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे
तरवाडे(ता.चाळीसगाव) : न्हावे ता.चाळीसगाव येथील एका ढाब्या जवळील शेतात रात्री बारा वाजाच्या अंधारात व शांततेत जुगाराचा डाव सुरू होता. आणि अचनाक जुगारी खेळणाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाल्याची घटना घडली.
आवश्य वाचा- हळदीचा कार्यक्रमात तलवार घेऊन नाचला; आणि सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात -
शनिवारी रात्री बाराच्या सुमारास शेतात जुगार अड्यावर छापा मारला यात चार जुगार खेळणारे ताब्यात तर बाकी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव ग्रामिण पोलीसांनी कंबर कसली असून असे धाडसत्र सुरुच राहणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
अशी झाली कारवाई
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची कामगीरी न्हावे तरवाडे रोडलगत न्हावे येथे गोल्डन पावभाजी ढाब्याजवळ सुरू असलेल्या जुगार अड्यावर ता. 19 रोजी रात्री 11वाजून50 मिनीटांच्या सुमारास चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी छापा मारून सात मोटारसायकल अंदाजे सुमारे दोन लाख दहा हजार सहाशे सत्तर रुपये किमतीच्या जप्त केल्या तर दोन हजार सहाशे सत्तर रुपये रोख व पत्यांचे कॕट हस्तगत करत चार जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आवश्य वाचा- पहाटे तीनला शेकोटीवर; संस्काराचे बोल टोचले म्हणून जीव जाईपर्यंत मारहाण
चोऱ्यांच्या प्रमाणात देखील वाढ
या शिवाय न्हावे,तरवाडे परिसरात अनेक ठिकाणी देशी, विदेशी, गावठी हातभट्टीची विनापरवाना दारूची विक्री होत असल्याची चर्चा गावभर होत होती पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे. भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ होत आहे. शेतातील अनेक शेतीपंप चोऱ्या होऊन एकही चोरी आजपर्यत उघड होत नसल्याने अशा कारवाया जर पोलीसांनी नेहमी केल्या पाहिजे अशी मागणी गावातून होत आहे.
यांनी केली कारवाई
जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्हायक पोलीस निरिक्षक धरमसिंग सुंदरडे, उपनिरीक्षक संपत आहेर, पोलीस कर्मचारी बिभीषण सांगळे व चार होमगार्ड कर्मचारी यांनी हि कारवाई केली.
आवर्जून वाचा- दक्षिण अफ्रिकेत तिरंगा फडकविणार पहिला आदिवासी गिर्यारोहक; मात्र खर्चाचा प्रश्न
यांना अटक झाली
जुगार खेळणारे प्रवीण दिनकर पिलोरे, समाधान अशोक पवार, रमेश कौतीक शेलार रा.न्हावे ता चाळीसगाव व ज्ञानेश्वर पितांबर राठोड रा.तरवाडे ता चाळीसगाव यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली.
जळगाव
संपादन- भूषण श्रीखंडे